Karuna Munde : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) सातत्याने मुंडेंवर आरोप करत आहेत. कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर न करता मुंडे यांनी निविदा काढल्याचा आरोप दमानिया यांनी केला. कृषी खात्यातील घोटाळे आणि बीड हत्या प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. मात्र, अद्यापही मुंडेंवर कोणताही कारवाई होत नाही. अशातच करुणा मुंडे (Karuna Munde) यांनीही मोठं विधान केलं. अजित पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा त्यांनी केला.
PF खातेधारकांसाठी आनंदवार्ता; आता UPI द्वारे अवघ्या काही मिनिटात काढता येणार पैसे…
विरोधी पक्षातील नेते सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, राजीनामा द्यायचा की नाही, हे स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवावं असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलतांना करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडेंनी खूप भ्रष्टाचार केला आहे. अंजली दमानिया हळूहळू सगळी प्रकरणं बाहेर काढतील. परंतु, अजित पवार सातत्याने त्यांना वाचवत आहेत. अजित पवारांवर माझा विश्वास नाही. कारण ते ऐकत नाहीत. अंजली दमानिया यांनी पुरावे दिले पण त्यांनी काही केलंच नाही, असं करुणा मुंडे म्हणाल्या.
अंजली दमनिया यांना गोपनीय कागदपत्र मिळतात कशी? : राष्ट्रवादीचा सवाल
धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच झाला असता, कारण शरद पवारांनी मला ४ ते ५ वेळा फोन करून बोलवलं होतं. परंतु, अजित पवारांनी काही तरी केलं आणि शरद पवार साहेबांनी मला वेळ दिला नाही, असा गौप्यस्फोट देखील करुणा शर्मा यांनी केला. याआधी करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना वाचवत असल्याचा दावा केला होता.
वाल्मिकी कराडने मारहाण केली, आता तो जेलमध्ये सडतोय, आता धनंजय मुंडेंचीही तीच अवस्था होणार आहे, असंही करुणा शर्मा यांनी सांगितलं.
पुढं त्या म्हणाल्या की, सध्या लोकांच्या मतांचा गैरवापर करणं सरकारकडून सुरू आहे. पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर लोकांनी पंकजा मुंडेंना नाकारले, परंतु तरी देखील आता त्या मंत्रिमंडळात आहेत, असं त्या म्हणाल्या.