Download App

तुम्ही रोहितला आमदार केलं, त्याने माझ्यापेक्षाही जास्त काम केलं; अजितदादांनी दिली कौतुकाची थाप

Ajit Pawar : कर्जत-जामखेडकरांनो, तुम्ही रोहित पवारला (Rohit Pawar) आमदार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे मी कौतुक करतो. ज्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कामांपेक्षा मी आमदार बनल्यानंतर जास्त कामे केली आणि माझ्यापेक्षा जास्त कामे रोहितने त्यांच्या तीन वर्षाच्या आमदारकीच्या काळात केली.

आधी या मतदारसंघात उसासाठी किती अडचणी होत्या हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता उसाच्या बाबतीत सगळ्या अडचणी मिटल्या आहेत. तुम्ही बदल केला म्हणून हे शक्य झाले. आधीच्या लोकप्रतिनिधींच्या तुलनेत जास्त निधी रोहित पवार यांनी मतदारंसघात आणला, असे स्पष्ट करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राम शिंदे यांना जोरदार टोला लगावला.

मी चॉकलेटवाला आमदार पण लोकांतून निवडून आलोय; रोहित पवारांनी राम शिंदेंना डिवचलं

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना दहा हजार सायकलींचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आज कर्जतमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.

पवार म्हणाले, की शालेय जीवनात आम्ही देखील सायकलीवरच शाळेत जात होतो. त्यावेळचा काळच तसा होता. दुसरा कोणता पर्याय नव्हता. तरी देखील आज प्रगत राष्ट्रात आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सायकलींचा वापर वाढला आहे. दुर्दैवाने आपल्याकडे सायकलींचे प्रमाण तितकेसे नाही. पण आपल्याकडे एक दिवस सायकलींचे महत्व पटल्याशिवाय राहणार नाही. सायकलींचा वापर करताना चुकीच्या कामासाठी होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

Tags

follow us