मी चॉकलेटवाला आमदार पण लोकांतून निवडून आलोय; रोहित पवारांनी राम शिंदेंना डिवचलं

मी चॉकलेटवाला आमदार पण लोकांतून निवडून आलोय; रोहित पवारांनी राम शिंदेंना डिवचलं

अहमदनगर : जेव्हा मी वडिल झालो त्यानंतर मी जास्त भावनिक झालो. मी मतदारसंघात कुठेही गेलो, एखादा लहान मुलगा मुलगी दिसली तर त्यांच्यात मला माझीच मुलं-मुली दिसत मग कधी चॉकलेट, कंपासबॉक्स, पॅड असेल हे जसं मी माझ्या मुला-मुलींना देतो तसं ते कर्जत-जामखेडच्या (Karjat-Jamkhed)प्रत्येक मुला-मुलींना देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)बोलून दाखवले. त्याचवेळी आमदार पवार म्हणाले की, काही राजकीय दृष्टीकोनातून (Political)लोकं माझ्यावर टीका करतात, चॉकलेटवाला आमदार (Chocolatwala MLA), त्यावर रोहित पवार म्हणाले की, अरे मी माझ्या मुला-मुलींना जसे चॉकलेट देतो, तसे ते माझे मुलं-मुली आहेत, माझे भाऊ-बहिण आहेत. त्यांना मी चॉकलेट का देणार नाही? असा सवाल करत थेट विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांच्यावर टीका केली आहे. कर्जत शहरात (Karjat)आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून 10 हजार शाळकरी मुला-मुलींना सायकल वाटपाचा (Distribute bicycles to school children)कार्यक्रम विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी रोहित पवार बोलत होते.

काँग्रेसचा राजघाटवर सत्याग्रह, प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

रोहित पवार म्हणाले की, मी आमदार व्हायच्या आधी चॉकलेटवाला मला म्हणायचे. तुम्ही मला आशिर्वाद दिला. या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी काम केलं. पूर्वी मला चॉकलेटवाला म्हणायचे, आता काय म्हणावं लागतंय. चॉकलेटवाला आमदार तो सुद्धा लोकांमधून निवडून आलेला, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी आमदार राम शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मी आमदार म्हणून मतदारसंघात फिरत असताना अनेकजण अडचणी सांगत असतात. जामखेडमध्ये एका गावात गेलो होतो, त्यावेळी पाहिले की, दहावीनंतर मुली शिकतच नाही, कारण तीथं एसटीबसच येत नाही. कर्जतमध्येही अशी गावं आहेत, ज्याठिकाणी एसटीबस येत नाही. त्यामुळे आपण यावर उपाय म्हणून शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी आमदार रोहित पवारांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube