Download App

Manohar Joshi : बाळासाहेबांचा एक आदेश अन् मनोहर जोशींनी क्षणात मुख्यमंत्रिपद सोडलं

Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे (Manohar Joshi) आज निधन झाले. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आज पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने एक कट्टर आणि बाळासाहेबांच्या मुशीत घडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. राजकारणातील त्यांच्या अनेक आठवणी सांगता येतील. त्यातही बाळासाहेबांचा फक्त (Balasaheb Thackeray) आदेश आला आणि जोशी यांनी क्षणात मुख्यमंत्री सोडले असे म्हटले जाते.

तसं पाहिलं तर मनोहर जोशी यांनी राजकीय कारकिर्दीत मुंबई महापौर, राज्याचे मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष अशी मोठी पदे भूषवली. राज्यात ज्यावेळी पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री होण्याचा मान जोशी यांना मिळाला होता. यानंतर त्यांची कारकीर्द ऐन भरात असतानाच त्यांना 1999 साली मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या जमिनीचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप झाला. या आरोपामुळे मनोहर जोशी यांना मु्ख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

गुरुजी गेले! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; अवघा महाराष्ट्र शोकाकुल

या प्रसंगाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. तुम्ही जेथेही असाल तेथे कृपया सर्वकाही थांबवा. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करून मला भेटायला या, असा मजकूर या पत्रात होता. बाळासाहेब ठाकरे यांचं हे पत्र होतं. मातोश्रीवरून आदेश आला म्हणताच जोशी यांनी कोणतीही खळबळ न करता तत्काळ मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या प्रसंगाची मोठी चर्चा त्यावेळच्या राजकारणात झाली होती.

यानंतर जेव्हा मनोहर जोशी यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा जोशी म्हणाले होते की एका गैरसमजातून मुख्यमंत्रिपद गेले. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे कधीच विचारले नाही. ज्यांनी पद दिलं त्यांना तो काढून घेण्याचाही अधिकार असतो. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश आले तेव्हा काहीच विचार न करता राजीनामा देऊनही टाकला. बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणून शिवसेनेत मला सर्व पदे मिळाली, असे मनोहर जोशी म्हणाले होते.

Nagarjuna: सुपरस्टार नागार्जुनवर कोसळला दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन

follow us