Vijay Wadettiwar : महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलं होतं. तर, राज्यात आलेल्या एकही पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही जण बेपत्ता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावरून कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुतीवर (Mahayuti) जोरदार टीका केली.
आता चर्चा नाही, तर पाकिस्तानशी अखेरची लढाई करावी ; फारुख अब्दुल्ला संतापले
सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकारमधील सध्याची परिस्थिती गोंधळलेली आहे. मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक नाही. तर दुसरीकडे, नगरविकास खात्याचे मंत्रिमंडळ म्हणते की, १०७ पाकिस्तानी बेपत्ता आहेत. ते सापडत नाहीत. सरकारमध्ये समन्वयाचा इतका अभाव कसा असू शकतो? सरकारमध्ये विसंवाद आहे, असं ते म्हणाले.
पुढं ते म्हणाले, एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्वाबद्दल बोलतो. त्याला स्थानिक मंत्री आम्हाला कायदा सुव्यवस्था शिकवू नका, शांतता कशी राखायची हे ठाऊक आहे, असं बोलतात. त्यानंतर हे गृहमंत्री आमचे आहेत, असंही सांगतात. जर दोन मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये असा वाद होत असेल तर हे सरकार किती गोंधळलेले आहे हे स्पष्ट होते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
1 मे पासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
पुढं वडेट्टीवार म्हणाले, राज्यात कमिशन खोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. खालच्या स्तरापासून लोकांनी पैसे दिल्याशिवाय कोणताही प्रशासकीय अधिकारी काम करत नाही. ज्या विभागाला काम दिली जाते, तिथं सुध्दा कमिशन दिल्याशिवाय कामे, निदी वितरित केल्या जात नाही, हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्याची सुरुवात मंत्रालयातून करावी लागले, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
नागपुरात स्फोटकासारखी परिस्थिती निर्माण होईल
नागपूर हे गृहमंत्र्यांचे शहर आहे. येथील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूपच भयंकर आहे. वेळीच बंधने घातली नाही तर नागपुरात स्फोटकासारखी परिस्थिती निर्माण होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून चौकशी करा
शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी झाली पाहिजे. एसआयटी नियुक्त करावी. याची उच्चस्तरीय चौकशी होणं आवश्यक आहे. त्यामध्ये जे संस्था चालक दोषी आहेत, शिक्षक विभागाची यंत्रणा दोषी आहे, त्या कोणालाही सोडून नये. पण घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी निरापराध माणसाचा बळी देऊ नका, असे वडेट्टीवार म्हणाले.