नंदुरबार : अवैध दारूच्या वाहतूकीवर (Illegal Liquor Traffic) नवापूर पोलीसांनी (Nawapur Police) जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील ((Superintendent of Police P. R. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करुन २२ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चरणमाळ घाटात करण्यात आली. अवैध वाहतूक करत असतांना वाहन सोडून पळून गेलेले पाच संशयीत आरोपींविरुध्द नवापूर पोलीस ठाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्यातील पाचही फरार आरोपीतांना लवकरच शोधून बेड्या ठोकण्यात येतील व त्यांचेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले. (Major action against illicit liquor traffic, goods worth Rs. 22 lakh 57 thousand seized, case registered against 5 persons)
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने गुजरात राज्यात अवैधपणे दारूची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारूची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
दिनांक १३ जून २०२३ रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर, गुजरात राज्यातील व्यारा व चलवान येथील काही इसम एकत्र येवून चारचाकी वाहन क्रमांक एमएच-२०. ईएल. ३१७७ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली व दादरा- नगर हवेली आणि दिव व दमन येथे विक्रीसाठी असलेली विदेशी दारु अवैधपणे विक्री करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, चरणमाळ घाट, नवापूर मार्गे गुजरात राज्यात वाहतूक करणार आहेत. त्यावरून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी सदर माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना देवून कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
Ahmednagar Fire : शहरातील आगीच्या घटनेला आमदार जगतापांनी धरले मनपा आयुक्तांना जबाबदार
कारवाईचे आदेश मिळताच नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने चरणमाळ घाटाच्या पायथ्याशी सापळा रचला. चरणमाळ घाटाकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना रात्री दिनांक १४ जून रोजी सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक काळ्या रंगाचे स्कॉर्पीओ वाहन भरधाव वेगाने येतांना दिसला, म्हणून पोलीस पथकातील अमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहन चालकाने सदरचे वाहन नवापूर तालुक्यातील बोरझर फाट्यावर सोडून पाट इसम काळ्या रंगाच्या वाहनामध्ये बसून तेथून पळून गेले.
दरम्यान, वाहनाची तपासणी केली असता त्यात १२ लाख ५७ हजार ८४० रुपये किमतीचे इम्पेरिअल ब्ल्यू हॅन्ड पिक्ड ग्रीन व्हिस्कीचे ३०१ खाकी रंगाचे खोके, त्यात १८० एम.एल.च्या एकुण १४, ४४८ नग काचेच्या बाटल्या, १ लाख ७२ हजार रुपये किमतीच ऑल शेशन गोल्डन कलेक्शन रिसीव्हर व्हिस्कीचे २५ खाकी रंगाचे खोके, त्यात १८० एम. एल. च्या एकुण १२०० नग काचेच्या बाटल्या, १० लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच – २० ईएल. – ३१७७ असा एकुण २२ लाख ५७ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन सोडून पळून गेलेले पाच संशयीत यांचेविरुध्द असे एकुण ०५ आरोपीतांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), ८३, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.