Ahmednagar Fire : शहरातील आगीच्या घटनेला आमदार जगतापांनी धरले मनपा आयुक्तांना जबाबदार

Ahmednagar Fire : शहरातील आगीच्या घटनेला आमदार जगतापांनी धरले मनपा आयुक्तांना जबाबदार

Ahmednagar Fire : अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना (Shops on fire) आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department)कळविले. सध्या अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होतं. ( MLA Sangram Jagtap held Municipal Commissioner Responsible for Ahmednagar Fire )

सुट्टीदिवशी कष्ट केलं, पुस्तक घेतली अन् लक्ष्मी शाळेत पहिली आली… एका संघर्षाची प्रेरणादायी कहाणी

या आगीत पाच ते सहा दुकानांचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालंय.

अमेरिकन संसदेतही आता घुमणार जय श्रीरामचा जयघोष! श्री ठाणेदार करणार हिंदू गटाची स्थापना

मात्र, ही पत्र्याची दुकानं अनधिकृत असून अशा घटना शहरात वारंवार घडत आहे. त्यातच मनपाचे अग्निशमन दल सक्षम नाही. असं म्हणत शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या सर्व घटनांना महापालिका आयुक्तांना जबाबदार धरलं आहे. अनधिकृत दुकानांवर महापालिकेने कारवाई करावी, जिथे शक्य असेल तिथे महापालिकेने अनधिकृत दुकानांना परवानगी द्यावी. तसेच मनपाच्या अग्निशमन दलात मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून अग्निशमन दलात भरती करावी असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमधील गुलमोहर रोडवरील पारिजात चौकात दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. दुपारी या दुकानांच्या जवळ असलेल्या जागेत कचरा पेटवल्यामुळे आग लागली असावी, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. कचरा पेटवल्यानंतर वाऱ्यामुळे जळत असलेला कचरा दुकानांजवळ येऊन दुकानांना आग लागली, असे सांगण्यात येत आहे. दुकाने एकमेकांना लागूनच असल्याने या भीषण आगीत अनेक दुकाने आगीच्या विळख्यात सापडली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube