अमेरिकन संसदेतही आता घुमणार जय श्रीरामचा जयघोष! श्री ठाणेदार करणार हिंदू गटाची स्थापना
वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री ठाणेदार यांनी येथील संसदेत हिंदू राजकीय गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. समविचारी खासदारांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेतील हिंदू समुदायाचे द्वेष आणि कट्टरतावादापासून संरक्षण करणे, हा याचा उद्देश आहे, असे ठाणेदार म्हणाले.
कॅपिटॉल हिल येथे आयोजित पहिल्या हिंदू-अमेरिकी संमेलनात बुधवारी (ता. 14) रोजी ठाणेदार यांनी ही घोषणा केली. डेमॉक्रॅटिक पक्षाचे ठाणेदार हे थर्टीन डिक्स्ट्रिक्ट मिशिगनचे खासदार आहेत. ते म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीला छळ, भेदभाव व द्वेषाविना धर्म निवडण्याचा आणि त्याने निवडलेल्या देवाची आराधना करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना न करण्याचाही अधिकार आहे. हे मूलभूत स्वातंत्र्य आहे, मूलभूत मानवी अधिकार आहे.”
अमेरिकेत संसदीय गट (कॉकस) म्हणजे समान वैधानिक उद्दिष्ट असलेल्या खासदारांचे गट असतात. येथील ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटिटिव्ह’च्या माध्यमातून ‘काँग्रेस सदस्य संघटना’ म्हणून या गटांची स्थापना होते आण या सभागृहाच्या नियमानुसार त्यांचे कामकाज चालते. ठाणेदार हे आधीपासून अमेरिकी संसदेतील समोसा गटाचे सदस्य आहेत. हा गट भारतीय वंशाच्या खासदारांच आहे. भारतासंबंधीचे मुद्दे ते संसदेत मांडत असतात.
कॅपिटॉल हिल येथे ‘अमेरिकन फोर हिंदूज’ या संस्थेने काल आयोजित केलेल्या पहिल्या हिंदू – अमेरिकन संमेलनाला देशभरातील हिंदू समुदायातील अनेक नेते उपस्थित होते. या संमेलनाला २० अन्य संघटनने समर्थन दिले होते. कॅलिफोर्नियाचे रहिवासी डॉ. रमेश झापरा हे या संघटनेचे संस्थापक आहेत.
मोदींच्या दौऱ्याआधीच गुडन्यूज! चीनला टाळून अमेरिकन कंपनी भारताच्या दारात
यावेळी ठाणेदार यांनी संसदेत हिंदू गटाच्या स्थापनेची घोषणा केली. भारतीय- अमेरिकी नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे. या गटात सहभागी होणाऱ्या सर्वांचे ठाणेदार यांनी स्वागत केले असून ‘आम्ही कोणाच्याही विरोधात नसून हा एक सर्वसमावेशक गट असेल,’ असे त्यांनी सांगितले.