Download App

धनगर आरक्षणाबाबत भाजपच्या आदिवासी मंत्र्यांचे मोठे विधान; सरकारची होणार कोंडी?

  • Written By: Last Updated:

नंदुरबारः मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी आंदोलने झाली आहेत. त्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) मध्ये आरक्षण देण्याची मागणी राज्यातून होत आहे. या आरक्षणासाठी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारकडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. धनगर समाजाला (Dhangar Reservation) अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने विरोध केला आहे. परंतु आता सरकारमधील भाजपचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit )यांनी यासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. धनगरांना आदिवासी आरक्षणामध्ये टाकण्याचा प्रश्नच नाही, असे मंत्री गावित यांनी म्हटले आहे. गावितांमुळे सरकारची आणखी कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कल्याण-डोंबिवली लोकसभेसाठी कोणाला पाठिंबा?; भाजप आमदाराने सांगूनच टाकलं

गावित म्हणाले; राज्य सरकार धनगर समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा विचारत आहे. आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या प्रश्न येतच नाही. तसे सरकारच्या मनातही नाही. धनगरांना आदिवांसी सारख स्वतंत्र आरक्षण देण्याचा शासनाचा विचार आहे. परंतु आदिवासी आरक्षणामध्ये त्यांना हिस्सा दिले जाणार नाही अशी शासनाची भूमिका आहे.

पुरोगामी विचारांसाठी आमची अखंड साथ; जाहीर सभेत शरद पवारांनी दिला शब्द

बहुतेक समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण मिळावे, असे वाटते. परंतु कोणतेही सरकार असा विचार करत नाही. एका समाजाला दुसऱ्या समाजाचे आरक्षण देऊन सरकार दोन समाजातमध्ये वितृष्ट निर्माण करणार नाही, असेही गावित यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.



आमदार नरहरी झिरवाळांचा इशारा

दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे. धनगर समाजाला सरकारने आरक्षण जरुर द्यावे, त्याला आमचा विरोध नाही. पण आदिवासींचे आरक्षण कमी करून किंवा त्यांच्यात समाविष्ट करून घेण्यास आमचा विरोध आहे. त्यासाठी माझे पद गेले तरी बेहत्तर पण आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी रोखठोक भूमिका झिरवाळांची आहे. धनगर समाजातील संघटनांनी अनुसूचित जमातीचे आरक्षणाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्त्वात आदिवासी संघटनांची बैठक घेण्यात आली. आम्ही आदिवासी जातीचे आहोत, म्हणून आम्हाला पदांची संधी मिळाली. पद असेल किंवा नसेल आदिवासी समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आमची प्रमुख जबाबदारी असल्याचे झिरवाळ यांनी म्हटले आहे.

Tags

follow us