Narendra Patil On Gunaratna Sadavarte : गेल्या महिन्याभरापासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लावून धरला आहे. त्यांनी अंतरवलीत मोठं आंदोलनही केलं. मात्र,अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. काल त्यांनी अंतरवली सराटी गावात सभा घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर निशाणा साधला होता. भुजबळ आणि सदावर्ते यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावी, असं विधान त्यांनी केलं होतं. या सगळ्या घडामोडीनंतर आता भाजप नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी भाष्य केलं.
भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याकडून चंद्रकांत पाटलांवर शाईफेक, पोलिसांनी घेतले ताब्यात
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर जरांगे पाटलांनी सदावर्तेंचा मालक कोण आहे, हे ठाऊक आहे. फडणवीसांनी सदावर्तेंना समज द्यावी, मराठ्यांच्या विरोधात जाऊन अंगावर येऊ नका, असं विधान त्यांनी केलं होतं. याविषयी आज माध्यमांशी बोलतांना नरेंद्र पाटील म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते चिल्लर माणूस आहे. सदावर्तेंची अक्कल किती चालते हे आम्हाला माहिती आहे. सदावर्तेंनी आमचा नाद करू नये. सदावर्तेंमुळं बाकीच्यांची नाव जोडली जातात, असं ते म्हणाले.
पुढं बोलतांना त्यांनी सांगितलं की, सदावर्ते स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. देवेंद्र फडणवीसांचा सदावर्तेंशी काहीही संबंध नाही. उगाच फडणवीसांचा त्यांच्याशी संबंध जोडू नाही, असं पाटील म्हणाले. ते तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मागील मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. आरक्षणाबाबत फडणवीस यांनी कुठेही टाळाटाळ केली नाही. सदावर्ते आणि फडणवीस यांची गोळाबेरीज करणं अयोग्य आहे, असं पाटील म्हणाले.
छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध केला. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले की, छगन भुजबळ कधीच मराठ्यांच्या बाजूने नव्हते. भुजबळांनी कोणत्या मराठ्यांना मदत केली हे माहीत नाही. भुजबळांनी कधी मराठ्यांना मदत केली, हे आजपर्यंत दिसलं नाही. भुजबळांनी मराठ्यांच्या प्रत्येक समितीला विरोध केला. भुजबळ हे आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात आहेत. मराठाद्वेषी आजही मंत्रीमंडळात आहेत. भुजबळांना त्यांच्या समाजाचं रक्षण करायचं आहे. आमचीही ताकद मोठी आहे, असा इशारा त्यांनी दिला.