भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याकडून चंद्रकांत पाटलांवर शाईफेक, पोलिसांनी घेतले ताब्यात

  • Written By: Published:
भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याकडून चंद्रकांत पाटलांवर शाईफेक, पोलिसांनी घेतले ताब्यात

Ink Attack on Chandrakant Patil : काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात भाजप नेते आणि तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरूषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं त्यांच्यावर शाईफेक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. सोलापूर शहरात ही घटना घडली. शाईफेक (Ink Attack) करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून चंद्रकांत पाटलांवर शाईफेक, पोलिसांनी घेतले ताब्यात 

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच शहरात आले होते. ते दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांनी पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे हा प्रकार टळला. पोलिसांनी भीम आर्मीच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

अजय मैंदर्गीकर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो भीम आर्मी संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री पाटील रात्री सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले होते. स्थानिक पालकमंत्री म्हणून हवा म्हणून यापूर्वीच चंद्रकांत पाटलांना सोलापुरात विरोध सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खुद्द पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती. तरीही अजय मैंदर्गीकर पोलीस सुरक्षा पार करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याजवळ गेला आणि त्याने काळे झेंडे दाखवत भारतीय जनता पार्टी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

या घोषणा देत असतांना लगेच त्याने शाईफेक केली. त्यामुळं गोधळ झाला. सरकारी नोकऱ्यांमधलं खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात याच शासकीय विश्रामगृहात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर धनगर आरक्षण कृती समितीचा समन्वयक शेखर बंगआळे यांने भंडारा उधळला होता.

दरम्यान, राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कंत्राटी भरती प्रक्रियेचा राज्यभरातून विरोध करण्यात येत आहे. त्याचाच विरोध करत या पदाधिकाऱ्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळं शासकीय विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube