शरद पवारांच्या आधी अजितदादाच वळसे पाटलांच्या मतदारसंघात पोहोचणार

NCP Political Crisis :  अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपसोबत जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते अजितदादांसोबत आहे. यातील एका नावामुळे आश्चर्य व्यक्ते केले जाते होते अन् ते नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील होय. दिलीप वळसे पाटलांना शरद पवारांचे  मानसपूत्र मानले जायचे. अजित पवारांच्या या निर्णयानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचा दौरा […]

Letsupp Image   2023 07 07T123525.477

Letsupp Image 2023 07 07T123525.477

NCP Political Crisis :  अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपसोबत जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते अजितदादांसोबत आहे. यातील एका नावामुळे आश्चर्य व्यक्ते केले जाते होते अन् ते नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील होय. दिलीप वळसे पाटलांना शरद पवारांचे  मानसपूत्र मानले जायचे. अजित पवारांच्या या निर्णयानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार असून वळसे पाटलांच्या आंबेगाव मतदारसंघात ते पहिली सभा घेणार असल्याची माहिती समोर आली होती. पण त्याच्याआधीच अजित पवार हे आंबेगावमध्ये हजेरी लावणार आहे. ( Ajit Pawar at Aambegaon Dilip Walase Patil )

आंबेगाव येथील शरद सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष प्रतिमाचिन्ह अनावरण व सहकार परिषद कार्यक्रमासाठी अजितदादा आंबेगावमध्ये येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप वळसे पाटील असणार आहे. यामुळे शरद पवारांनी आंबेगावमध्ये येण्याचा अगोदर अजित पवारच तिथे दाखल होणार आहे. उद्या 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

NCP Political Crisis : …म्हणून शरद पवारांचा धुळे-जळगाव जिल्हा दौरा झाला रद्द

दरम्यान, 5 जुलै रोजी अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटाचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. तुम्ही जर आंबेगाव मध्ये सभा घेतली तर 6 दिवसांनी मला देखील सभा घ्यावी लागेल. असा थेट इशार त्यांनी शरद पवारांना दिला होता. परंतु शरद पवार यांनी आंबेगावमध्ये सभा घेण्याच्या अगोदरच अजितदादांनी आपला दौरा सुरु केला असल्याचे दिसते आहे.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

दरम्यान, वळसे पाटील बोलले म्हणजे पवार यांचेच ते मत आहे अशी धारणा राष्ट्रवादी आणि इतर पक्षातही होती. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांनी देखील वळसे पाटील यांना मानस पुत्र मानले होते. मात्र आपणच बोट धरुन राजकारणात आणलेला मुलगा आपल्याचविरोधात बंडखोरी करेल याची कल्पनाही पवार यांनी कधी केली नसावी. त्यामुळेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांमध्ये पहिला धडा हा वळसे पाटील यांनाच शिकविण्याचे शरद पवारांनी मनावर घेतल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version