Prakash Ambedkar : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. चा निवडणुकांत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भापजविरोधी पक्षांची मोट बांधून इंडिया आघाडीची स्थापन केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत (INDIA Alliance) सहभागी झाले. मात्र, वंचित बहूजन आघाडी अद्याप इंडिया आघाडीत सहभागी झाली नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वंचित इंडियासोबत जाणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. आता खुद्द प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीच यावर भाष्य केलं.
World Cup 2023 : मार्करमने झळकविले वर्ल्ड कपमधील वेगवान शतक; लंकेसमोर 429 धावांचे लक्ष्य
आज साताराऱ्यात वंचितचा मेळावा झाला. या सभेला संबोधित करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता जाऊन 14 महिने झाले. या चौदा महिन्यात आघाडीतील तीनही पक्षांना लोकसभेच्या जागा वाटायला वेळ मिळाला नाही. कारण, आपण एक झालो, आपल्यात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जागा वाटप झालं तर आपल्याला तिहार जेलमध्ये जावं लागेल, अशी भीती विरोधकांना आहे. काहींच्या मागे ईडी आहे. आपल्यावरही सत्तेतील सरकार कारवाया सुरू करेल, याची धास्ती विरोधकांना आहे. आणि कोणत्याचा विरोधकाला जेलमध्ये जायचं नाही. लालू प्रसाद यादवांना जेलमध्ये टाकलं. त्यांनी तिथून राजकारण केलं. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत किती जण लालूंसारखे आहेत? असा सवाल आंबेडकरांनी केला.
ते म्हणाले, भाजप, आरएसएस हे सैतान आहेत. मोदीही त्यातलेच आहेत. विरोधक एक झालो, एकत्र लढले, तर तो या सैतानांचा पराभव आहे. त्यामुळं ते कारवाया करतात. ते स्वत:ला उद्धवस्त होऊ देणार नाहीत. यासाठीच ते विरोधकांना एकत्र येऊ देत नाही. विरोधक मोठ्या संख्येनं एक झाले नाही, तर या सैतानांचा खेळ यशस्वी होणार, हा एक विचारधारेचा पराभव असेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
आंबेडकर म्हणाले, आम्ही कितीदा म्हणालो, आम्हाला इंडिया आघाडीत घ्या. पण, ते घेत नाही. मोदींनीही सांगितलं असेल की, वंचितवाल्यांना सोबत घेऊ नका, आम्ही यांच्या चौकशी केल्या पण, यांच्याकडे खडकूही मिळत नाही. आमची भीतीपण वाटते की, आम्ही इंडियात गेलो तर मोदींनाही तासल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळं इंडियात घेतल्या जात नाही, असं आंबेडकरांनी म्हटलं.
२०२४ निवडणूक ही दोन विचारधारांत आहे. गोडसे, हेडगेवार, गोवलणकर ही एक विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाजाज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब, आंबेडकर यांची विचारधारा. या निवडणुकीत आता मतदारांना ठरवायं तुम्ही कोणाच्या बाजूने आहात ते? असं आंबेडकर म्हणाले.