Download App

Pravin Pisal : मराठा समाजाचा आधार हरपला; वर्ल्ड मराठा ऑर्गेनायजेशनचे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचे निधन

Pravin Pisal : मराठा समाजासाठी (Maratha Community) एक दु:खद बातमी आहे. विश्व मराठा संघटनेचे (World Maratha Organization) संस्थापक असलेले प्रवीण पोपटराव पिसाळ (Pravin Poptrao Pisal) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळं मराठा समाजाचा आधार हरपल्याची भावना जनमाणसातून व्यक्त होत आहे. (Pravin Pisal, founder of World Maratha Organization passed away)

प्रवीण पिसाळ यांनी 2013 मध्ये अगदी तरुण वयातच मराठा समाजाच्या हितासाठी काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी समाजाच्या हितासाठी करत असलेल्या कामाला संघटनेचं स्वरुप दिलं. त्यामुळं त्यांचं काम अल्पावधीतच चळवळ झाली. मराठा आरक्षण आंदोलनाला वेग आला होता, याच दरम्यान त्यांनी विश्व मराठा संघटनेची स्थापना केली, या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना रोजगारासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना मदतही केली. प्रवीण पिसाळ हे तरुणांना रोजगार मिळवून देण्यात, त्यांच्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी नेहमीच पुढाकार घ्यायचे.

एक कोटी मराठा समाज WMO शी ऑनलाइन विशेषतः Facebook वर जोडले गेले होते, ज्यातून ते समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करू लागले. महत्त्वाची बाब म्हणजे विश्व मराठा संघटना कोरोनाच्या काळात सर्वाधिक सक्रिय राहिले आणि हजारो लोकांना वैद्यकीय मदत देण्याचं काम केल. यामागे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचे महत्त्वाचे योगदान होते. पिसाळ यांचं काम बघून त्यांनी स्थापन केलेल्या ग्रुपला, राज्यातून देशातूनच नव्हे तर अगदी परदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत झाली.

2008 पासून त्यांनी मराठा समाजाशी कनेक्ट होण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला. त्यासाठी विश्व मराठा संघटनेचं संघटनही त्यांनी तयार केलं. पुढे WMO ने Facebook वर 10 मिलियनचा आकडा पार केला आहे. मराठा समाजासाठी स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या प्रवीण पिसाळ यांची मात्र, मराठा वसतिगृहाची कल्पना अद्याप तरी पूर्णत्वास आलेली नाही.

धाराशिव जनता सहकारी बँकेत करोडोंचा फ्रॉड! संचालक मडळाविरूध्द गुन्हा दाखल

1 कोटीवर गेलेला हा ग्रुप नंतर आतील विरोधकांनीच बंद केला. तरीही प्रवीण पिसाळ यांचे कार्य सुरूच होते, प्रवीण पिसाळ यांचे तरुण वयातलं हे कार्य संपूर्ण समाजासाठी, तळागाळातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

प्रवीण पिसाळ यांनी आपल्या नावाला मराठा जोडून कट्टरता, धर्मांधता दाखवली असली तरी त्यांनी अन्य कोणत्याही समाजाकडे किंवा गटाकडे तुच्छ भावनेने किंवा नकारात्मक दृष्टीने पाहिले नाही. आपण सर्वच समाजाला सोबत घेऊन चालणार आहोत, अशी त्यांची भूमिका होती. दरम्यान, करोडो मराठा समुदायातील लोकांना जोडणारे प्रवीण पिसाळ यांच्या अचाकन जाण्यानं त्यांचे अन्य तरुण सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रवीण पिसाळ यांना समाजाच्या सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

प्रवीण पिसाळ यांनी स्थापन केलेल्या ग्रुपला, राज्यातून देशातून आणि परदेशातून काम पाहून भरीव मदत देखील झाली.

 

Tags

follow us