Raj Thackeray on Hindi : महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांचं मीरारोड येथे जोरदार भाषण झालं. या भाषणात राज ठाकरे यांनी नेहमीच्या ठाकरी शैलीत (Hindi) राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट घणाघात केलाय. परंतु, या भाषणात राज ठाकरे यांनी प्रथमच गुजराती भाषिकांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रावर पूर्वीपासून केंद्राचा दबाव राहिलेला आहे. केंद्राचं हे पूर्वीपासूनचं आहे. काँग्रेस असल्यापासूनचं हे सगळं सुरु आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला.त्यासाठी प्रचंड मोठा लढा झाला. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. काही गुजराती व्यापारी आणि नेत्यांचा होता असा थेट आरोप राज ठाकरे यांनी प्रथमच केला.
Video : हिंदी भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लढतो?, राज ठाकरेंचा थेट फडणवीसांवर घाव
मुंबई महाराष्ट्राला मिळू नये ही पहिली मागणी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. वल्लभभाई पटेलांनी. आपण त्यांना लोहपुरुष म्हणून मानत आलो. देशाचे गृहमंत्री. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात आंदोलनं झाली. तेव्हा मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसांना ठार मारलं असा थेट घणाघात राज यांनी यावेळी केला आहे.
अनेक वर्षापासून त्यांचा मुंबईवर डोळा आहे. हे सर्वकाही सहज होत नाही. हे चाचपडून पाहत आहे. हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतो का? मराठी माणूस पेटतोय का? तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायची ही त्यांची स्वप्न आहेत असा थेट आरोप राज ठाकरे यांनी या भाषणात पहिल्यांदाच केला आहे.