Download App

दोन समाजात भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा, अन् जनतेला…; रोहित पवारांचा भुजबळांवर पलटवार

दोन समाजात वाद भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या.. - रोहित पवार

  • Written By: Last Updated:

Rohit pawar on Chhagan Bhujbal : अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनादरम्यान मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खळबळजनक दावा केला. अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केला. मात्र, रोहित पवार (Rohit Pawar) आणि राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जरांगेंना पुन्हा तिथं आणून बसवलं, असा दावा भुजबळ यांनी केला. यावर आता आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

भुजबळ म्हणजे लिंबू कापणारा, अंगारा फुंकणारा एक चमत्कारी बाबा; जरांगेंची नव्या वादाला फुंकर 

रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात लिहिलं की, आदरणीय भुजबळ साहेब, सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे त्या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का?, असा सवाल रोहित पवारांनी केला.

योगेश केदारांच्या मध्यस्थिला यश; जरांगे अन् राऊतांमधील वाद मिटला 

आपण केलेले आरोप सिद्ध करा
पुढं त्यांनी लिहिलं की, ओबीसींचे राजकीय आरक्षण आरक्षण संपवू पाहणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा ज्येष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे साहेबांवर ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करतोय, त्याच नेत्याच्या हातात आज गृहमंत्रालय आहे. त्यामुळं त्यांना सांगून माझ्यावर  आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे.

ते म्हणाले, असो, हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन समाजात वाद भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या… तसेच भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या, ही विनंती, असंही रोहित पवार म्हणाले.

छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या माहितीनुसार अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता. मात्र, रात्री 2 वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना तिथे परत आणून बसवलं, असं भुजबळ म्हणाले होते.

follow us