Download App

जुना फोटो शेअर करत रोहित पवारांचे अजितदादांना आता थेट आव्हान

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar tweet old Family photo : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट एकमेंकावर जोरदार निशाणा साधत आहे. आतापर्यंत एकत्र असलेले पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवार हे थेट शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावर बोलत आहेत. तसेच उत्तरही अजित पवारांना आता मिळत आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा राजकीय संघर्ष होऊ शकते. त्यामुळे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कुटुंबाचे एकत्रित फोटो टाकत अजित पवारांना थेट आव्हान दिले आहे.

आज वेळ नवीन असली तरी भावना मात्र त्याच आहेत, पण त्या पोचत नसल्याने आणि समजत नसल्याने संघर्ष मात्र अटळ आहे, असे रोहित पवारांनी आपल्या एक्स अकाउंटवरून म्हटले आहे. तसेच शेवटी प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा आहे. साहेब, लडेंगे..जितेंगे असेही रोहित पवारांनी म्हटले आहे. रोहित पवारांना ट्वीट केलेला फोटोत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे व स्वतः रोहित पवार हे आहेत. एका सण उत्सवाच्या सोहळ्यात एकत्रित असा फोटो आहे.

CM शिदेंच्या भाषणाकडे कोल्हापूरकरांनी फिरवली पाठ, रिकाम्या खुर्च्या पाहून मुख्यमंत्र्यांचा हिरमोड

त्या फोटोबरोबर जुने ट्वीटर (एक्सवर) पोस्ट आहे. 2019 मध्ये अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीबाबत एक पोस्ट रोहित पवारांनी लिहिली होती. तिचा आधार आजच्या पोस्टला रोहित पवारांनी घेतला आहे.


दिल्लीसमोर लोटांगण घालायचे काम, आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा


काय आहे जुनी पोस्ट

लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते. अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही. आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं.

follow us