Download App

जेलमध्ये भेटायला वेळ नाही अन् सुटकेनंतर चव्हाणला कडाडून मिठी; मंत्री शिरसाटांचा अदित्य ठाकरेंना टोला

Sanjay Shirsath यांनी आज पत्रकार परिषद घेत सूरज चव्हाणच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंना देखील टोला लगावला आहे.

Sanjay Shirsath on Aditya Thackarey : शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील खडसावून टीका केली. याचवेळी त्यांनी सूरज चव्हाणच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंना देखील टोला लगावला आहे.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रवीण दराडे सहकार खात्याचे सचिव

यावेळी बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना लंडनला जायला वेळ आहे. मात्र सुरज चव्हाणला जेलमध्ये भेटायला जायला वेळ नाही. तसेच त्यांनी त्याला कधी डबा देखील दिला आहे का? असा सवाल करत शिरसाटांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

Sweden Firing : मोठी बातमी! स्वीडनमधील शाळेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

दरम्यान आज सुरज चव्हाण जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यांची कथेत खिचडी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर आज सुटका झाली आहे. त्यांना एक लाखाच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. ते गेल्या 17 जानेवारी 2024 पासून जेलमध्ये होते.

आज सायंकाळी पाच वाजता ते तुरुंगाबाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सूरज यांना कडाडून मिठी मारली. भारत त्यांचं मातोश्रीवर स्वागत केलं. यावरूनच शिरसाटानी ठाकरेंना टोला लगावला आहे.

याच पत्रकार परिषदेमध्ये संजय शिरसाठ यांनी वर्षा बंगल्यामध्ये रेड्याची शिंग पुरून ठेवल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली.

follow us