Download App

ट्रम्प यांची मध्यस्थी! तिसर्‍याला नाक घालण्याची गरज काय?, शरद पवारांचा थेट सवाल

तिसरा देश काश्मीरबाबत बोलू शकत नाही, तिसर्‍याला नाक घालण्याची गरज काय? असा सवाल शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केला.

Sharad Pawar : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) शस्त्रसंधी झाली. इतकेच नव्हे तर, त्यानंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं म्हटलं होतं. यावर आता शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं.

तू अशा स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभा आहेस…, अर्जुन कपूरने 26 वर्षीय अर्जुनसाठी लिहिली एक भावनिक चिठ्ठी 

तिसरा देश काश्मीरबाबत बोलू शकत नाही, तिसर्‍याला नाक घालण्याची गरज काय? असा सवाल पवारांनी केला.

शरद पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ट्र्म्प यांच्या मध्यस्थिविषयी बोलताना पवार म्हणाले की, काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवेदनशील मुद्दा आहे. अशा परिस्थितीत, तिसर्‍या देशाने या विषयात हस्तक्षेप करणं योग्य आहे का? असा सवाल पवारांनी केला. पुढं ते म्हणाले, शिमला करारानुसार, केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरच्या विषयावर द्विपक्षीय चर्चा होऊ शकते. तिसर्‍या देशाने नाक घालण्याची गरज नाही, असं पवारांनी ठामपणे सांगितलं.

सहकार कायद्यात बदल करण्यासाठी समिती स्थापना करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा 

विशेषत: दोन्ही देशांचे पंतप्रधान उपलब्ध असताना अमेरिकेसारख्या देशाची मध्यस्थी का घ्यावी, अमेरिकेची मदत घेण्याची गरज का पडली ? असा सवाल पंतप्रधानांचे भाषण तुम्ही ऐका, मीही त्यांचे भाषण ऐकतो. त्यानंतर बोलू, असं ते म्हणाले.

संसदेत काश्मीरच्या विषयावर चर्चा होणं कठीण असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं. काही मुद्दे गोपनीय ठेवण्याची गरज असते. विशेष अधिवेशन बोलवायच असेल तर बोलवावं… पण त्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांना बोलवून माहिती दिली गेली पाहिजे, असं ते म्हणाले.

राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी शिमला करार वाचला पाहिजे. त्याआधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिमला करार वाचला पाहिजे. हा द्विराष्ट्र करार आहे आणि त्याच्यामध्ये कोणतंही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामध्ये ट्रम्प आले कुठून? काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामध्ये ट्रम्प असो की, पुतिन यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही. किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही. ते त्यांच्या गावचे पाटील आणि आम्ही आमच्या गावचे पाटील, असं राऊत म्हणाले.

follow us