India-Pakistan ceasefire trade Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली नसती तर अणुयुद्ध झालं असतं आणि लाखो लोकांचे प्राण गेले असते असं वक्तव्य केलं. (Trump) तसंच, दोन्ही देश अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारामागे व्यापार हे एक महत्त्वाचं कारण राहिलं आहे असंही ट्रम्प यावेळी म्हणाले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये ते बोरत होते.
या करारात अमेरिकेने मदत केली आहे आणि दोन्ही देशांना मदत करण्यास तयार आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला. त्याचबरोबर भारतीय अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचं विधान फेटाळून लावलं असून हा करार पूर्णपणे द्विपक्षीय आहे. कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नाही. भारतीय लष्कराचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानी लष्कराने १० मे रोजी युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता, जो भारताने स्वीकारला असंही ते म्हणाले आहेत.
अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नाही, सडेतोड उत्तर देणार; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
या करारानंतर, दोन्ही देशांनी सीमेवर युद्धबंदीची घोषणा केली, ज्यामुळे या प्रदेशात संभाव्य युद्ध परिस्थिती टाळता आली. दरम्यान, काश्मीर वाद अजूनही सुटलेला नाही. हा प्रश्न सुटला नाही तर भविष्यात तणाव वाढू शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत केलं त्यामध्ये ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत कोणताही उल्लेख केला नाही.
पाकिस्तानला मदत
जगातील अनेक देशांनी जेव्हा पाकिस्तानला शस्त्रे विकणे बंद केले तेव्हा चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला मदत केली. माहितीनुसार, सध्या पाकिस्तान चीन आणि तुर्कीकडून अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करत आहे. तर दुसरीकडे तुर्कीने भारताला शस्त्रास्त्रे विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. 10 जुलै 2024 रोजी तुर्की संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या बैठकीत संरक्षण विभागाचे अधिकारी मुस्तफा मुरत सेकीर यांनी अनवधानाने हे मान्य केले तेव्हा ही माहिती समोर आली होती.