Download App

Maharashtra Bhushan : अंधारेंनी कंत्राट घेण्याऱ्या कंपनीचा इतिहासचं काढला; म्हणाल्या ही तर…

Sushma Andhare On Maharashtra Bhushan :  काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान केला. या कार्यक्रमानंतर तिथे आलेल्या जवळपास 20 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेवरुन राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते आहे. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप केला आहे. या कार्यक्रमाचे टेंडर देताना भ्रष्टाचार करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

कॉन्सेप्ट कम्युनिकेशन या इव्हेंड मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीला  या  कार्यक्रमाचे 14 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. यानंतर कॉन्सेप्ट कम्युनिकेशन कंपनीने पुढे सब टेंडर काढलं तिचे कंत्राट लाईट अँड शेड कंपनीला दिले. लाईट अँड शेड ही अतिशय छोटी कंपनी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे जिल्हाप्रमूख असल्यापासून त्यांना या छोटे-मोठे कंत्राट त्यांना मिळत आलेले आहेत. यानंतर तो मोठा उद्योजक झाल्याचे अंधारे म्हणाल्या आहेत.

Ajit Pawar : कोणाच्या सोईने हा कार्यक्रम करण्यात आला, याची चौकशी करा अन्यथा…

काही काळानंतर  या व्यक्तीला सध्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे देखील येऊन मिळाले. सध्या या कंपनीमध्ये नरेश म्हस्के, संदीप वेंगर्लेकर व विजू माने या तिघांची पार्टनरशिप आहे. यांनी मिळून आपल्या ओळखीने 14 कोटी रुपयांच्या टेंडरचे काम हातात घेतले. तसेच अनाथांचे नाथ एकनाथ हे मुख्यमंत्र्यांवरील गाणे देखील याच कंपनीने तयार केले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

या लोकांनी 14 कोटी रुपयांचे कंत्राट घेतले होते पण तिथे आलेल्यांना सावलीत बसण्याची सोय देखील केली नव्हती. त्यामुळे या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व ही कंपनी ब्लॅकलिस्टेड करण्यात यावी, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Tags

follow us