Download App

Election Results 2023 : 2018 मधील चूक टाळली, मोदी फॅक्टर चालला; 3 राज्यांत भाजप सुस्साट!

Election 2023 Results : देशात चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून (Election Results 2023) आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा मोदी फॅक्टर चालला आहे. लोकांनी मोदींच्याच नावावर भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतांचं दान केलं अन् सत्ताधीश होण्याच्या दिशेने वाट करून दिली. या राज्यांपैकी छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसची सत्ता होती. या दोन्ही राज्यांत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. तर मध्यप्रदेशातही काँग्रेसला खूप मागं ढकललं आहे. दुपारी एक वाजताच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 53 जागांवर, मध्यप्रदेशात 163 तर राजस्थानात 114 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेसला मात्र जबर दणका बसला आहे. राहुल गांधींसह अन्य काँग्रेस नेत्याचा जोरदार प्रचार फेल ठरला आहे.

Election Results 2023 : भाजपनं जिंकल्याचा दावा करणं हाच मोठा विनोद; राऊतांचा मोदी-शहांना खोचक टोला

मागील 2018 च्या निवडणुकीत भाजपने राजस्थानात वसुंधराराजे, मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करत निवडणूक लढली होती. या तिन्ही राज्यांत भाजपाचा पराभव झाला होता. आताच्या निवडणुकीत मात्र भाजपने चूक केली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाने जनतेला मतं मागितली. त्याचा परिणामही दिसून आला. या तिन्ही राज्यात सध्या भाजप आघाडीवर असून बहुमत मिळवताना दिसत आहे. या राज्यांत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे.

छत्तीसगडमध्ये एकूण 90 विधानसभा जागांसाठी 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान पार पडलं. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात एकूण 1 कोटी 55 लाख 61 हजार 460 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला होता. छत्तीसगडमध्ये पहिल्यांदाच 75.8 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे पुरुष मतदारांपैकी महिला मतदारांचा अधिक कल यंदाच्या मतदानात दिसून आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच निवडणूक निकालांचे एक्झिट पोल समोर आले होते. इंडिया टुडे आणि माय इंडिया संस्थांच्या पोलनूसार काँग्रेसला 40-50 जागा तर भाजपला 36-40 जागा मिळणार असल्याचं दिसून आलं होतं. एक्झिट पोलनूसार भाजप-काँग्रेसमध्ये चुरस असल्याचं सांगण्यात येत होतं. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरल्याचं आजच्या निकालावरुन दिसून येत आहे.

Rajasthan Elections : ..तर PM मोदीही वसुंधराराजेंना रोखू शकणार नाहीत; राजस्थानचं गणितच बदललं

follow us