Government Schemes : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावेळी (Budget)एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरु केली आहे. या योजनेला लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana )2023 असं नाव दिलं आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणाच्या (Education)मदतीचं उद्दिष्ट ठेऊन सुरु केला आहे.
किंग खानने दाखवली दुसऱ्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; पुन्हा एकदा दिसणार रोमँटिक अंदाजात
महाराष्ट्रात सुरु केलेल्या लेक लाडकी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या मुलींचा सामाजिक-आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी आणि मुलींबद्दलच्या नकारात्मक रुढी-परंपरांना तोडण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरु केला आहे.
NCRB Report 2022 : महाराष्ट्रात सर्वाधिक दंगली, वर्षभरात 8 हजार गुन्ह्यांची नोंद
योजनेचे फायदे काय?
लेक लाडकी योजनेंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत मुलींच्या जन्मापासून ती मोठी होईपर्यंत वाढत जाते.
विविध वयोगट अन् शालेय ग्रेडच्या आधारे मदतीचे वर्गीकरण केले गेलेलं आहे.
गरिब कुटुंबातील मुलींना कोणत्याही अडचणीशिवाय शिक्षण घेता यावे म्हणून या योजनेंतर्गत दिलेली आर्थिक मदत दिली जाते.
आर्थिक दृष्टीनं गरीब आणि पिवळे आणि नारंगी राशन कार्ड धारक कुटुंबांना याचा लाभ दिला जातो.
आर्थिक मदत :
– लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर मुलीचे स्वागत करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून 5 हजार रुपयांची मदत दिली जाते.
– मुलगी शाळेत जाण्यास सुरुवात करते, तेव्हा सरकार शैक्षणिक खर्चासाठी 6 हजार रुपये दिले जातात.
– मुलगी सहावीत गेल्यावर 7 हजार रुपयांची मदत दिली जाते.
– अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर मुलीच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार 8 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
– मुलीचं वय 18 वर्षे झाल्यानंतर 75 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरते. या रकमेचा उपयोग तिच्या भविष्यातील उच्च शिक्षण किंवा विवाहासाठी केला जाऊ शकतो.
लाडकी योजनेसाठी आवश्यक पात्रता
– लेक लाडकी योजनेचा फायदा घेण्यासाठी, अर्जदार मुलगी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
– ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
– अर्जदाराच्या कुटुंबाकडं पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असणं आवश्यक आहे.
– लाभार्थीचे बँकेमध्ये खातं असणं आवश्यक आहे.
– या योजनेंतर्गत 18 वर्षांपर्यंतच्या मुलींना मदत केली जाते.
आवश्यक कागदपत्रं
– उत्पन्नाचा दाखला
– पिवळं किंवा केशरी राशन कार्ड
– मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
– अर्जदार मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
– पत्त्याचा पुरावा
– पालकांसह लहान मुलीचा फोटो
– मोबाईल नंबर
– ईमेल आयडी
– बँक पासबुक
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे, कारण सरकारकडून या योजनेची घोषणा केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे सरकारकडून ही योजना लागू केल्यानंतर त्यासाठी अर्ज करता येतील.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.