Budget Session : वजन बघू नका त्यामागचं प्रेम महत्वाचे; मुंडे-मुनगंटीवारांमध्ये मिश्किल संवाद
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवनेशन सुरु आहे. त्यानिमित्ताने सभागृहात अनेकवेळा सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आल्याचे पहायला मिळते आहे. एखाद्या मुद्यावरुन सभागृहात मोठ्या प्रमाणावर गोंधळ पहायला मिळतो. पण आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार व निरंजन डावखरे यांच्यात सभागृहामध्ये हास्यविनोद झाल्याचे पहायला मिळाले आहे.
आज विधीमंडळाचं कामकाज सुरळीत सुरु होते. नगरविकास विभागवार चर्चा सुरु असल्याने ज्यांचा विषय होता ते सर्व सभगृहात होते. अनेक जण आज गप्पा आणि भेटीगाठीत रंगले होते. उद्या गुढीपाडवाच्या निमित्ताने अनेकांची गावी जाण्याची लगबग सुरु होती. विधीमंडळाच्या अधिवेशनात अनेकजण मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडचयाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत होते.
https://letsupp.com/maharashtra/the-textile-commissioners-office-will-not-go-to-delhi-but-the-commissioner-will-fadnaviss-answer-26368.html
यावेळी भाजपचे आमदार निरंजन डावखरे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मिठाईची भेट देत होते. डावखरे हे सर्व आमदारांना मिठाई देत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत होते. यावेळी त्यांनी आपले जुने सहकारी धनंजय मुंडे याना देखील मिठाई दिली व शुभेच्छा ही दिल्या. या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा रंगल्याचे दिसून आले.
त्यानंतर मिठाई भेट देण्यासाठी डावखरे हे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आले. त्यांनी मुनगंटीवार यांना शुभेच्छा देत मिठाई दिली. त्यात धनंजय मुंडे आले व त्यांनी सुधीरभाऊ याना अठवण करुन दिली की, भाऊ निरंजन ने गेल्या वेळी एक किलोची मिठाई दिली होती. आता केवळ पावभर मिठाई देतो आहे. काय चाललाय हे निरंजनकडे लक्ष नाही तुमचं, असे म्हणत मुंडेंनी डावखरे यांना मिश्किल टोला लगावला. आमच्या कडे होता तेव्हा चांगले दिवस होते त्याचे असे सांगत मुंडेनी डावखरे यांची फिरकी घेतली.
यानंतर हजरजबाबी असलेल्या निरंजन डावखरे यांनी तात्काळ उत्तर दिलं. भाऊ यांना सांगा वजन नका पाहू, भेट देण्यामागे असलेल प्रेम बघा, अशा खुमासदार शैलीत त्यांनी मुंडेंना उत्तर दिले. त्यामुळे अशा गंमतीजमातिने वातावरणात दिलखुलसपणा आला होता.