Download App

भाजप ‘राष्ट्र प्रथम’ मंत्रावर वाटचाल करणाऱ्या देशभक्तांचा परिवार; रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांशी चव्हाण यांचा संवाद.

  • Written By: Last Updated:

रायगड: भारतीय जनता पार्टी (BJP) हे केवळ एक राजकीय संघटन नाहीतर, ‘राष्ट्र प्रथम’ या मंत्रावर वाटचाल करणाऱ्या देशभक्तांचा परिवार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात आपला परिवार दिवसेंदिवस मजबूत होत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकामंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan)यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यातील भाजप-महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.

Assembly Election: रविंद्र चव्हाण पालकमंत्री झाले आणि पालघरचे भाग्य खरंच उजळले का ?

यावेळी तालुका युवामोर्चा अध्यक्ष रोशन चंद्रकांत भगत, तालुका उपाध्यक्ष प्रशांत राजाराम पवार, महिला मोर्चा उपाध्यक्ष सोनाली जयेश वाडेकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष सुबोध बाळाराम पाटील, युवा मोर्चा चिटणीस राकेश नरेश फडताडे, युवा मोर्चा चिटणीस कुणाल सुनील यादव, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रज्ज्वल किशोर गणतांडेल, युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्निल शशिकांत गाडे, उपाध्यक्ष गजानन शंकर पाटील, सरचिटणीस संकेत जयंत जोशी, युवा मोर्चा तालुका चिटणीस रोहित रविंद्र पाटील, महिला मोर्चा तालुका चिटणीस वेदश्री विनोद पाटील, अलिबाग तालुका सरचिटणीस सतीषचंद्र द्वारकानाथ पाटील, कामगार जिल्हा उपाध्यक्ष संजय सुनील यादव, रायगड जिल्हा चिटणीस विश्वास जोशी, अलिबाग तालुका सरचिटणीस राजेश पाटील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली.

Dombivli Assembly Constituency: ‘डोंबिवली फर्स्ट’म्हणणारे रविंद्र चव्हाण विजयाचा चौकार मारणार ?

यावेळी खासदार धैर्यशील पाटील, दक्षिण रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील, अलिबाग विधानसभा संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा, जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा सरचिटणीस गीताताई पालरेचा, जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us