विजयी गुलाल आपलाच, कोकणात महायुतीच जिंकणार, रविंद्र चव्हाणांना विश्वास
Ravindra Chavan : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार पुन्हा आण्यासाठी डोंबिवलीचे (Dombivli) आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) सध्या अनेक मतदारसंघात भेटीगाठी करत महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. आज त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघ, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ आणि दापोली विधानसभा मतदारसंघा भेट दिली.
यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. महायुती सरकारने राज्यात राबवलेल्या लोककल्याणकारी योजना घराघरात पोहचवून महायुतीच्या उमेदवारांच्या मागे सर्वशक्तीनिशी उभे रहा असे आवाहन त्यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्तांना केले. आपल्याला महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचे आहे, हे ध्येय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एकजुटीने काम करा असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका देखील केली. आपल्या महायुती सरकारने नेहमीच महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं, परंतु महाविकास आघाडीने मधल्या अडीच वर्षांमध्ये सर्व विकासकामांना स्थगिती देत महाराष्ट्राचा विकास ठप्प पाडला. त्यामुळे महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी आवश्यक असणारी व्हीजन ही केवळ महायुतीकडेच आहे. असं आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले.
यावेळी दापोली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार योगेश कदम, रत्नागिरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत, गुहागर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मुलांना फ्री शिक्षण अन् बेरोजगार तरुणांना 4 हजार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 24 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.