Download App

आशुतोष काळेंसाठी अजित पवार मैदानात, 14 नोव्हेंबरला घेणार जाहीर सभा

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) संपूर्ण राज्यात जाहीर सभा घेत आहे. तर उद्या (14 नोव्हेंबर) कोपरगावचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या प्रचारासाठी अजित पवार जाहीर सभा घेणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे सायंकाळी 5.00 वाजता अजित पवार जाहीर सभा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात आ. आशुतोष काळे यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आ.आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आ. आशुतोष काळे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या जोशात प्रचार करीत आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील बहुतांश रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत. मतदार संघातील जनतेशी नेहमी संपर्कात राहणारा व जनतेचे प्रश्न आणि अडी-अडचणी सोडवून कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत.

या कामी त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मोलाची साथ व सहकार्य मिळाले असून आपल्या शिलेदाराच्या प्रचारासाठी ते स्वत: गुरुवार (दि. 14 ) रोजी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी महायुतीतील कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले आहे.

ICC Rankings : आयसीसीची ताजी क्रमवारी जाहीर, स्टार फलंदाज संजू सॅमसनची मोठी झेप

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.

follow us