Download App

BMW कार, रायगडमध्ये जमीन अन् म्युच्युअल फंडमध्ये कोटींची गुंतवणूक, जाणून घ्या आदित्य ठाकरेंची संपत्ती

Aditya Thackeray : शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray : शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वरळी विधानसभा (Worli Constituency) मतदारसंघात मनसेकडून संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर आतापर्यंत महायुतीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. मात्र येत्या एक- दोन दिवसात महायुती देखील आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवाराची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे यांच्यासोबत वडील उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर केले आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीचं विवरण दिले आहे.

या प्रतिज्ञापत्रानुसार आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे जमीन असून त्याची किंमत 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये आहे. याच बरोबर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे आदित्य ठाकरे यांच्यानावावर दोन दुकानाचे गाळे आहे. ज्यांची किंमत 4 कोटी 56 लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे बीएमडब्लू कार आहे. तसेच त्यांच्याकडे 1 कोटी 91 लाख 07 हजार 159 रुपयांचे दागिने देखील असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांच्याकडे जंगम मालमत्ता 15 कोटी 43 लाख 03 हजार 060 रुपये आहे तर त्यांच्याकडे अचल मालमत्ता 6 कोटी 04 लाख 51 हजार 350 रुपये आहे. त्यांच्या बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये आहे याच बरोबर बँक खात्यात फिक्स डिपॉसिटमध्ये त्यांच्या नावावर 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपये आहेत.

प्रतिज्ञापत्रानुसार आदित्य ठाकरे यांनी शेअर बाजारात देखील 70 हजारांची गुंतवणूक केली आहे तर म्युच्युअल फंडमध्ये त्यांच्या नावावर 10 कोटी 13 लाख 78 हजार 052 रुपये आहे तसेच बॉण्ड्समध्ये त्यांनी 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि एलआयसीच्या एका पॉलिसीमध्ये त्यांनी 21 लाख 55 हजार 741 रुपये गुंतवले आहे.

मोठी बातमी! विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, वाचा सविस्तर

याच बरोबर त्यांच्या नावावर डिलाईल रोड खुला केल्या प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे.

follow us