मोठी बातमी! काँग्रेसची पहिली यादी: सर्व दिग्गजांना उमेदवारी; फडणवीस, चव्हाणांविरोधात शिलेदार ठरले
Congress First list For Maharashtra Legislative Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Assembly) काँग्रेसने (Congress) आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर संगमेरमधून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना दक्षिण कराडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाना पटोले (Nana Patole) यांना साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
नितीन राऊत यांना नागपूर उत्तरमधून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मालाड पश्चिममधून अस्लम शेख निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे तर पुरंदरमधून संजय जगताप यांना काँग्रेसकडून संधी देण्यात आली आहे. तर भोरमधून संग्राम थोपटेंना, रवींद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/tElqOKF6ak
— Congress (@INCIndia) October 24, 2024
तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा यशोमती ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याचबरोबर नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातून सुनील देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर चांदिवली विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद आरिफ नसीम खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Tanpure vs Kardile : राहुरीत पुन्हा तनपुरे विरुद्ध कर्डिले सामना रंगणार…
धारावीमधून ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर रावेरमधून धनंजय चैधरींना संधी मिळाली आहे. तर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून के. सी. पाडवी यांना संधी देण्यात आली आहे.
तर भोकर विधानसभा मतदारसंघातून तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजपने माजी मुख्यंमत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.