Tanpure vs Kardile : राहुरीत पुन्हा तनपुरे विरुद्ध कर्डिले सामना रंगणार…
Tanpure vs Kardile : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी आज गुरुवार रोजी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये नगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे.
राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याने आता या मतदार संघात तनपुरे विरुद्ध कर्डिले (Tanpure vs Kardile ) असा राजकीय सामना रंगणार आहे. नगर जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आणखी एक मतदारसंघ म्हणजे राहुरी विधानसभा.
तनपुरे आणि कर्डिले यांच्यामधील संघर्षामुळे राहुरीचे राजकारण चांगलेच तापते. सध्या राहुरी विधानसभेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता असून प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत. नुकतेच येणाऱ्या विधानसभेसाठी तानपुरे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तर कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. 2019 मध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे 1 लाख 09 हजार 234 मतांनी विजयी झाले होते. तर भाजपचे कर्डिले शिवाजी भानुदास यांचा 23 हजार 326 मतांनी पराभूत झाले होते. आता पुन्हा एकदा राहुरीमध्ये या दोन नेत्यांमध्ये विधानसभेचा सामना रंगणार आहे.
अंकगणित नाही; 44 उमेदवार जाहीर केल्यानंतर आग्रहाखातर पाटलांनी जाहीर केला शेजारी बसलेला उमेदवार
दरम्यान राज्यात विधानसभेचे बिगूल वाजले असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात थेट लढत झाल्यास कोणाचं पारडं जड भरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.