Akhil Bharatiya Maratha Mahasangh Support To Hemant Rasne : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान (Assembly Election 2024) अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलंय. उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आलाय. कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. मराठा समाजासाठी गेली 125 वर्षांपासून कार्यकर्ता असणाऱ्या मराठा महासंघाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे रासने यांची कसब्यात ताकद वाढली आहे.
गुरुवार पेठेतील मराठी भांडीवाले धर्मशाळेत झालेल्या कार्यक्रमावेळी मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, “केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजासाठी सारथीसारख्या संस्था तसेच अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सोडवण्यात आला होता, परंतु राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही. समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे बळ वाढले आहे. येत्या काळामध्ये मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही असेल”.
‘शिंदे-फडणवीस रागावले’; रवींद्र धंगेकरांनी कारणही सांगून टाकले..
मराठा महासंघाचे संतोष नानवटे म्हणाले की, “आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुणे लोकसभा निवडणुकीपासून महायुतीला विजयी होण्यासाठी पाठिंबा जाहीर जाहीर केलेला आहे. हेमंत रासने हे कायम सर्वच समाजाला सोबत घेऊन चालणारे कार्यकर्ते आहे. समाजाप्रती असणारी त्यांची बांधलकी ते कायम जपतात, त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाचा त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. आमदार झाल्यानंतर मराठा समाजाचे प्रश्न हेमंत रासने मार्गी लावतील, हा विश्वास आहे.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रकाश सुपेकर, पुणे जिल्हा सरचिटणीस दुष्यंतराजे जगताप पुणे शहर अध्यक्ष मयूर गुजर, संपर्कप्रमुख राजेश केदारी, पुणे शहर संघटक नरेंद्र मोहिते, अमित साळुंखे, पुणे शहर उपाध्यक्ष विनायक मिसाळ, वनिता जगताप, जगदीश गाडेकर, राहुल पवार, शेखर तूप सुंदर, विकास जाधव, इंद्रजीत श्रीकांत शिंदे, गहिनीनाथ गायकवाड, हनुमान खंदारे, राज ढमढेरे, हनुमंत गायकवाड, राहुल मगरे, अमृता सुपेकर, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, अजय खेडेकर, राजेश यनपुरे, प्रमोद कोंढरे, आरती कोंढरे, सुधीर कुरुमकर, चंद्रकांत पोटे, अमित कंक आदी उपस्थित होते.