Kasaba By Election : आमचे जुने नेते म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, शिंदेंनी ठाकरे गटाला डिवचलं
मुंबई : ‘पोटनिवडणुकांमध्ये असे विजय येत असतात. पण आमचे जुने नेते कॉंग्रेसच्या विजयाचा एवढा आनंद साजरा करत आहेत. ते म्हणतात ना की, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. त्यांना मोठा आनंद झालाय. मोठं अश्चर्य त्यांना वाटतय. त्यांना असाच आनंद साजरा करू द्या पण देशात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाला आहे.’ कसबा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसच्या विजयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाला देखील टोला लगावला आहे.
Kasba By Election : एका विजयाने हुरळून जाऊ नका, मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीला टोला
त्याच बरोबर ते पुढे असे देखील म्हणाले की, ‘पोटनिवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणुका नसतात. पोटनिवडणुकांचं गणित वेगळं असतं आणि सार्वत्रिक निवडणुकांच गणित वेगळं असतं. त्यामुळे एका विजयाने मविआने हूरळून जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. एक पोटनिवडणूक म्हणजे सार्वत्रिक निवडणुका नाही. त्यांना आनंद घेऊ द्या.’
‘पोटनिवडणुका या स्थानिक निवडणुका असतात त्यामुळे काही त्रुटी उणीवा राहिल्या असतील. त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचे कार्यकर्ते यामुळे खचून जाणारे नाही. पण एका विजयाने विरोधकांनी देखील हूरळून जाऊ नये.’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
कसबा मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 11 हजार 40 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.