Ambadas Danve : एवढी मोठी मेजॉरिटी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागले पाहिजे नाही खरंतर यामुळे ‘दाल में कुछ काला है’ हे नक्की आहे. अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीवर केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री (Matoshri) येथे पराभूत झालेल्या उमेदवारांची आज बैठक घेतली. या बैठकीनंतर अंबादास दानवे माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आज मातोश्री येथे पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक झाली. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघातील तक्रारी मांडल्या आणि त्यावर बैठकीत चर्चा झाली आहे. पराभूत झालेले सर्व उमेदवार पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने संघटनेचे काम करायला तयार झाले आहेत. आम्ही तसा निर्धार केला आहे. असं अंबादास दानवे म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी ईव्हीएमवरून (EVM) देखील भाजपवर हल्लाबोल केला. आज संविधान दिन आहे. एक एक उमेदवारांनी सांगितलेल्या घटना या आश्चर्यजनक आहेत. एखाद्याच्या स्वतःच्या घरातील मतदान सुद्धा त्याला पडली नाहीत. असे अनेक विषय आज प्रत्येकाने मांडले. काही ठिकाणी समान बूथवर कमी मतदान मिळालं आणि काही मतदारसंघात बाहेर वायफाय इलेक्ट्रॉनिक गोष्टी सापडल्या. अशा विविध गोष्टी एव्हिडन्स म्हणून जमा करून येत्या काळात न्यायालयीन प्रक्रिया करू अशी माहिती त्यांनी दिली.
तर शिवसेनेचा नुकसान की फायदा आहे ठरवायला शिवसेना सक्षम आहे. शिवसेना सक्षमतेने विचार करून अशाप्रकारे संपूर्णपणे वैचारिक मानसिक संपूर्ण तयार आहे. अशी टीका त्यांनी विरोधकांवर बोलताना केली. तसेच एवढी मोठी मेजॉरिटी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागले पाहिजे नाही खरंतर यामुळे दाल में कुछ काला है हे नक्की आहे.
मोठी बातमी! राज्यसभेच्या 6 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान, ‘या’ दिवशी मतमोजणी
भाजपाकडे मोठी शक्ती आहे. त्यांच्याकडे 133 आमदार आहे आणि उरलेले ते कसेही गोळा करू शकतात. तशी भारतीय जनता पार्टीला इतरांची जास्त गरज आहे असं मला वाटत नाही. असं देखील माध्यमांशी बोलताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.