समोर फडण’वीस’ असले तरी तुम्ही 20 आहात, पुरून उरा..; उद्धव ठाकरेंचा आमदारांना कानमंत्र

  • Written By: Published:
समोर फडण’वीस’ असले तरी तुम्ही 20 आहात, पुरून उरा..; उद्धव ठाकरेंचा आमदारांना कानमंत्र

Uddhav Thackeray : राज्यातील विधानसभेच्या निकालाने (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात महायुतीला (Mahayuti) तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. कारण 95 जागां लढवूनही ठाकरे गट केवळ वीस जागा जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर पक्षप्रमुख द्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ‘मातोश्री’वर पक्षाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बोलावली. या बैठकीत ठाकरेंनी आपल्या आमदारांना आश्वस्त केलं.

यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपतच पुढची वाटचाल असणार; डॉ. अतुलबाबा भोसलेंची ग्वाही… 

समोर फडणवीस असले तरी तुम्ही वीस आहात, तुम्ही त्यांना पुरून उरा, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या ठाकरे गटाने आज 20 नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी निवडून आलेल्या त्यांच्या 20 आमदारांशी संवाद साधला. विधानसभेत सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कदाचित आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा आमदारांचे मानसिक मनोधैर्याचे खच्चिकरण होऊ शकतं, याची जाणीव ठाकरेंना आहे. त्यामुळं आमदारांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी आमदारांशी चर्चा केल. जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, त्यांना पुरून उरा, असा कानमंत्र त्यांनी दिला.

ट्रम्पेटने मते घेतल्याने मलाही फायदा, वळसे पाटलांची माध्यमांसमोर जाहीर कबुली… 

दरम्यान, या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. सुनील प्रभू यांची पक्ष प्रतोदपती तर आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गटनेता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे. खरंतर आदित्य ठाकरे यांची गटनेतेपदी नियुक्ती व्हावी, अशी माझी इच्छा होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला. त्यामुळे मी गटनेता म्हणून शिवसेनेसाठी काम करणार असून सर्व प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंबादास दानवे काय म्हणाले?
आमच्या पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची इतर पक्षांप्रमाणेच निवड करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांची निवड नियमानुसार झाल्याचं अंबादास दानवे म्हणाले. शिंदे गटाकडून चुकीचे आरोप केले जात आहेत. आमचा एकही आमदार फुटणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube