Candidate List Sharad Pawar NCP: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. काही जागा निश्चित झाल्या आहेत. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी 45 जागांची पहिली यादी जाहीर केलीय. बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्याची फाइट होणार आहे. याचबरोबर यादीत किती नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली हे जाणून घेऊया….
मोठी बातमी! काँग्रेसची पहिली यादी: सर्व दिग्गजांना उमेदवारी; फडणवीस, चव्हाणांविरोधात शिलेदार ठरले
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केलीय. शरद पवारांबरोबर असलेल्या जवजवळ सर्वच आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले. तर चार महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लंकेंसाठी ही दुहेरी संधी मिळाली आहे. तर मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या माजी मंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य एकनाथ खडसे यांची मुलगी आहे. अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री अत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या वडिल धर्मरावबाबा अत्राम यांच्याविरोधात लढणार आहेत. या मतदारसंघातून मुलगीविरुद्ध वडिल अशीच लढत होणार आहे. तर घाटकोपर पूर्व मतदारसंघातून राखीव जाधव यांना संधी देण्यात आली आहे.
नवे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड, केंद्र सरकारने केलं शिक्कामोर्तब
नवे चेहरे कोण, एक मुस्लिम उमेदवारही
बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार, तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील, पारनेरमधून माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, हडपसर मतदारसंघातून माजी महापौर प्रशांत जगताप, कोपरगाव मतदारसंघात संदीप वर्पे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वर्पे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. तर एक मुस्लिम उमेदवार देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवक पदाधिकारी मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतदारसंघातून ओबीसी आणि मराठा समाजातील तगडे उमेदवार स्पर्धेत होते. परंतु एकनिष्ठ राहिल्याचे फळ मेहबूब शेख यांना मिळाले आहे. आष्टी मतदारसंघात मराठा, ओबीसी समीकरण आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदार जास्त नाहीत. त्यानंतर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जवळजवळ सर्वच आमदारांना उमेदवारी जाहीर केलीय.