Assembly Election Result : राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result) सर्वच कल हाती आले असून निकालानूसार महायुतीच वरचढ ठरली असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपला गड कायम राखला असून नाशिकमधील येवला मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी आपणच येवल्याचे किंग असल्याचं सिद्ध करुन दाखवलंय. मागील काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भुजबळांना पाडण्याबाबतचे आवाहन मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलं होतं. मात्र, जरांगेंच्या या आवाहनाला पार करीत छगन भुजबळ मोठ्या मताधिक्क्याने पुन्हा विधानसभेवर गेले आहेत.
नेवाशात शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे विजयी, ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख पराभूत
नाशिकच्या येवला मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या मतदारसंघाचं चित्र क्लिअर झालं असून महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव करीत छगन भुजबळ निवडून आले आहेत. छगन भुजबळ यांना एकूण 1 लाख 31 हजार 945 मते मिळाली असून माणिकराव शिंदे यांना 1 लाख 5887 मते मिळाली आहेत. भुजबळ यांनी शिंदे यांचा जवळपास 26 हजार मतांनी पराभव करुन मीच येवल्याचा किंग असल्याचं सिद्ध करुन दाखवलंय. दरम्यान, राज्यात एकट्या महायुतीला 228 जागा जिंकल्या असून दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालायं. महाविकास आघाडीला अवघ्या 57 जागा मिळाल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
Parli Vidhan Sabha Result : परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; तब्बल 50 हजारांनी मिळवला विजय
दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी आव्हान उभं केलं आहे. भुजबळांना पहिल्यांदाच मोठं आव्हान असल्याचं दिसत होतं, पण आपल्या विजयाबाबत भुजबळ निर्धास्त होते त्यांनी आपला विजय पक्का असून आपण 60 ते 70 हजार मताच्या फरकाने विजयी होवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. अखेर या निवडणुकीत भुजबळांनी विजय मिळवून दाखवलायं.