Download App

अवसरीला मेडिकल कॉलेज सुरू करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

पाच एकर जागेत मंचर एसटी डेपो, अवसरी येथे सुसज्ज प्रार्थमिक आरोग्य केंद्र इमारत, जलजीवन पाणी योजना ही कामे मार्गी लागली आहेत.

  • Written By: Last Updated:

मंचर : अवसरी ग्रामस्थांनी जागा दिल्यास मेडिकल कॉलेज चालू करण्याचा माझा मानस आहे असे आश्वासन देत मोठी घोषणा सहकार मंत्री व महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)  यांनी केली आहे. ते अवसरी खुर्द येथील कोपरा सभेत बोलत होते.

नेहमीच सभासद अन् शेतकऱ्यांचे हित जपले; भीमाशंकर अन् ‘माळेगाव’ ची तुलना नको – वळसे पाटील

अवसरीचे ग्रामस्थ माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे

उपस्थितांना संबोधित करताना वळसे पाटील म्हणाले की, गेल्या पस्तीस वर्षात अवसरी खुर्द व परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून अवसरी ग्रामस्थ सतत माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत या पुढील काळात सुद्धा मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार; वळसे पाटलांची ग्वाही

20 नोव्हेंबरपासून साखर कारखाने चालू होणार

यावेळी वळसे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी कारखाना चालू गळीत हंगाम चालू करण्याबाबत चर्चा झाली असून 20 नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.  अवसरी, तांबडे मळा हद्दीत शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिक कॉलेज, कवयित्री शांता शेळके सुसज्ज सभागृह, तांबडेमळा येथे १०० खाटांचे रुग्णालय काम सुरु आहे.

विकास कामांमुळे आंबेगावची विशेष ओळख : दिलीप वळसे पाटील

पाच एकर जागेत मंचर एसटी डेपो, अवसरी येथे सुसज्ज प्रार्थमिक आरोग्य केंद्र इमारत, जलजीवन पाणी योजना ही कामे मार्गी लागली असल्याचेही वळसे पाटलांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी गुजरातचे केंद्रीय निरीक्षक अतुल ब्रह्मभट, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, भाजपचे डॉ. ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे, शिवसेना राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

follow us