Download App

विरोधकांच्या फेक अजेंड्याला थेट उत्तर, मंत्री मुरलीधर मोहोळांचा हल्लाबोल

Muralidhar Mohol : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.

  • Written By: Last Updated:

Murlidhar Mohol : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. सध्या माहितीनुसार, महायुती 236 जागांवर आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडी 49 जागांवर पुढे आहे. तर इतर 3  जागांवर अपक्ष पुढे आहे.

महायुतीने पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यात अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात महविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यात अभूतपूर्व यश मतदारांच्या साथीने मिळाले.

या विश्वासाबद्दल मतदारांचे मनापासून आभार. मतदारांचा हा कौल म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वावर, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर जनतेने मतांद्वारे व्यक्त केलेला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल आणि संवेदनशील नेतृत्वाचाही हा विजय आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या गडावर मतदारांनी महायुतीचा झेंडा रोवत जवळपास 58 पैकी 45 जागा दिल्या आहेत, हा आकडा आमचे आखलेले मिशन पूर्ण करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल. पुणे शहरातील आठपैकी सात आणि जिल्ह्यातील तेरापैकी अकरा जागा महायुतीला देताना पुणेकरांनी महायुतीच्या विकासाच्या कामांवर मोहोर उमटवली आहे.

कोल्हापूरात महायुतीची त्सुनामी, महाविकास आघाडीचा क्लीन स्वीप, ‘हे’ आहे कारण

विरोधकांच्या फेक अजेंड्याला देवेंद्रजींनी दिलेले थेट उत्तर जनतेलाअधिक आश्वासक वाटल्याने मतांचे भरघोस दान महायुतीच्या पदरात मतदारांनी टाकले. मतांच्या लाचारीपोटी व्होट जिहादच्या विरोधकांच्या कारस्थानाला जनतेने धर्मयुद्धाव्दारे उत्तर देऊन एक इशाराच दिला आहे. महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन. असं त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

follow us