Trumpet Symbol : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) (NCPSP) मोठा फटका बसल्याने पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करण्यात आली होती. तर आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने तुतारीबाबत महत्वाचा निर्णय दिला आहे. ज्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की, Trumpet नावाचं जे स्वरवाद्य आहे, त्याचं भाषांतर तुतारी असं करण्यात आलं आहे मात्र हे भाषांतर चुकीचं असून आमच्या पक्षाच्या चिन्हाच्या नावाशी ते तंतोतंत जुळत आहे आणि त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत असून मतदार चुकून तुतारीला मतं देण्याऐवजी त्या Trumpet हे चिन्ह घेऊन उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान करत आहे. अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
यावर आता निवडणूक आयोगाने निर्णय देत Trumpet नावाचं मराठीत भाषांतर ट्रम्पेट असं करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.
4 भारतीय कंपन्यांसह तब्बल 400 संस्थांवर अमेरिकेने घातली बंदी, ‘हे’ आहे कारण
लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात आमचा उमेदवार तुतारी आणि पिपाणी चिन्ह सारखेच असल्याने जिंकता जिंकता पराभव झाला असा दावा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात येत आहे. याच बरोबर अनेक मतदारसंघात पिपाणीमुळे आमच्या पक्षाला मोठा फटका बसल्याचीही तक्रार निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली होती.