Download App

सोन्यात 6 कोटींची गुंतवणूक अन् 182 कोटी रुपयांचे कर्ज, मंगलप्रभात लोढांची संपत्ती जाणून घ्या

Mangalprabhat Lodha : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी

  • Written By: Last Updated:

Mangalprabhat Lodha : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. यातच मलबार हिल विधासभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीबाबत खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल 436 कोटींची संपत्ती आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सध्या 436 कोटी 80 लाख 48 हजार 591 रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्यावर 182.93 कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 123.28 कोटी रुपयांचे कर्ज आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावावर एकूण 123 कोटी 38 लाख 98 हजार 588 रुपयांची संपत्ती आहे तर पत्नीच्या नावावर 10 कोटी 28 लाख 75 हजार 340 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 125 कोटी 54 लाख 49 हजार 707 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

तसेच त्यांच्याकडे जंगम मालमत्ता 123 कोटी 39 लाख रुपये इतकी आहे तर स्थावर मालमत्ता 125 कोटी 54 लाख रुपये आहे. याच बरोबर त्यांनी शेअर बाजारात 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे तर सोन्यात 6 कोटी रुपयांची गुंतणवूक आहे. तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 2 लाख 12 हजार 376 रुपयांची रोख आहे. मंगलप्रभात लोढा या मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झाले आहे.

पोलिसांची मोठी कारवाई, लॉरेन्स बिश्नोई गँगचे 7 शूटर्सना अटक

या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पहिला मिळत आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

follow us