शिर्डीत एकाच इमारतीत 7 हजार मतदार कसे? राहुल गांधींनी लोकसभेत विचारला जाब…
Rahul Gandhi Statement On Maharashtra Vidhan Sabha Election : आज अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 चा तिसरा दिवस आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून देखील वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात 5 महिन्यांत लाखो मतदार जोडले गेले. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार (Maharashtra Vidhan Sabha Election) केली. शिर्डीतील एकाच इमारतीत सात हजार मतदार जोडले गेले असल्याचं त्यांनी म्हटलंय.
यावेळी (Parliament Budget Session 2025) बोलताना राहुल गांधींनी जातीय जनगणनेचा मुद्दा देखील उपस्थित केलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान महाराष्ट्रात हिमाचलमध्ये समान संख्येने मतदारांची भर पडली, असा दावा देखील त्यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण लोकसंख्येइतके नवीन मतदार मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 70 लाख नवीन मतदार जोडले गेलेत. मी कोणतेही आरोप करत नाहीये. मी फक्त एवढंच म्हणत आहे की, काहीतरी समस्या आहे.
फक्त लाथ घातली हे चुकलं, गोळ्या घालायला पाहिजे होत्या; चंद्रहार पाटलांचा महाराष्ट्र केसरीवरून वार
देशासमोरील आव्हानांवर चर्चा करताना राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे जात जनगणना, एससी-एसटी, ओबीसी यांचा सहभाग वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे होते. हिमाचल प्रदेशचे सर्व मतदार अचानक लोकसभा निवडणुकीनंतर येतात. लोकसभा मतदार यादी, नावे आणि पत्ते देण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली होती. ज्या विधानसभेच्या जागांवर भाजपला अपयश मिळालं होतं, त्या ठिकाणी नवीन मतदारांची भर पडली. आमच्याकडे हा डेटा आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीद्वारे निवडणूक आयुक्तांची निवड केली जाणार होती. सरन्यायाधीशांना का हटवले? असा सवाल देखील यावेळी राहुल गांधींनी उपस्थित केलाय.
US Tariff War : सगळीकडे ‘टॅरिफ’ धोरणाची चर्चा पण, हे काम कसं करतं? खरचं खळबळ माजणार?
उत्पादनात चीन आपल्यापेक्षा पुढे असल्याचं राहुल गांधी म्हणालेच. आपली जातीय व्यवस्था चांगली आहे. त्यांनी तेलंगणातील जातीय जनगणनेचा उल्लेख करत तेलंगणातील 90 टक्के एससी-एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक असल्याचे सांगितले. देशातील ओबीसी लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी नाही. भाजपच्या ओबीसी, एससी-एसटी खासदारांकडे सत्ता नसल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं. यावर भाजप खासदारांनी गदारोळ सुरू केला. राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदारांनी आक्षेप घेतला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन निवडणूक आयुक्त आणण्यावरही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केलाय. ते म्हणाले की, ही एक योजनाबद्ध रणनीती होती. निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय मिळणार नाही. तुम्ही सरदार पटेलांचा उल्लेख करता पण त्यांच्या मूल्यांना दररोज चिरडता. तुम्ही भगवान बुद्धांबद्दल बोलता, पण त्यांच्या मूल्यांवर विश्वास ठेवत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय.