विधानसभा लढणार! अरुण मुंडेंच्या भूमिकेने राजळेंच्या अडचणी वाढल्या…

विधानसभा लढणार! अरुण मुंडेंच्या भूमिकेने राजळेंच्या अडचणी वाढल्या…

BJP Arun Munde Will Contest : अहिल्यानगर : कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून आणि कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने तसेच अपक्ष अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म भरून काही झालं तरी विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढवायची ही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. आमची भूमिका ही एकच आहे. भारतीय जनता पार्टीचे तिकीट मागत असताना आम्ही तालुक्यात कार्यकर्त्यांचे मेळावे देखील घेतले आहेत. तसेच माझी पक्षश्रेष्ठींना आणखीही विनंती आहे की, आपण तिकीट बदलावे. कारण असं न झाल्यास या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची उमेदवारी धोक्यात येऊ शकते, असे म्हणत भाजपचे पदधिकारी अरुण मुंडे ( Arun Munde) यांनी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

अजितदादांनी भाजपचे दोन माजी खासदारच फोडले; महायुतीतच फिरले घड्याळाचे काटे

शेवगाव आणि पाथर्डी (Shevgaon Pathardi) या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे, अशी माझी भावना आहे. विद्यमान आमदार या ठिकाणी निवडून येणार नाही, अशी परिस्थिती सध्या या दोन्ही तालुक्यात निर्माण झालेली आहे. तशी माहिती देखील आम्ही प्रदेशाध्यक्षांना कळवली आहे. त्यांचा निर्णय लवकरच येईल, असं अपेक्षित आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार आहे, असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केलंय.

शेवगाव पाथर्डी विधासभा मतदारसंघात भाजपने तिसऱ्यांदा मोनिका राजळे यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळतेय. शेवगाव येथील हॉटेल साई पूजा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मत-मतांतर जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित बैठकीत झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे हे बोलत होते.

…अन्यथा आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करणार, आठवलेंच्या कार्यकर्त्यांचा महायुतीला थेट इशारा

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब डोंगरे, नगरसेवक शब्बीर शेख, अंकुश कुसळकर, गुरुनाथ माळवदे, मयूर हुंडेकरी, परमेश्वर केदार, भूषण देशमुख, बाळासाहेब कोळगे, दिगंबर काथवटे, ज्ञानेश्वर रासनकर, किरण पाथरकर, रामभाऊ पोटफोडे, बबन भुसारी, गोकुळ भागवत, अमोल सागडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामुळे आता शेवगाव-पाथर्डीत तिरंगी लढत होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube