मंचर : आंबेगाव तालुक्यात महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून, निवडणुकीच्या तोंडावर उद्योजक रमेश येवले यांनी हाती शिवधनुष्य घेतलं आहे. येवले यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे दिलीप वळसे पाटील यांची ताकद दुपटीने वाढली आहे.
Video : मोठं मोठी कामे करण्याची क्षमता फक्त वळसे पाटलांमध्येच; आढळरावांची तुफान बॅटिंग
वळसे पाटलांच्या प्रचाराचे आदेश
रमेश येवले यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येवले यांच्या हाती भगवा देत त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेल्या वळसे पाटलांचा प्रचार करण्याचे आदेश येवले यांना दिले आहे.
पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आंबेगावातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले : वळसे पाटील
वळसे पाटलांच्या विजयसाठी शर्थीचे प्रयत्न करणार
येवले यांच्या शिवसेना प्रवेशाने महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना फायदा होणार आहे. अल्पावधीत येवले यांनी तरुणांची फळी उभी केल्याने वळसे पाटील यांची बाजू भक्कम होणार आहे. महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे रमेश येवले यांनी सांगितले. यावेळी उद्धवसेनेचे जिल्हा समन्वयक नित्यानंद येवले, शैलेश येवले, विजय केंगले, धनेश चासकर, संतोष पिंगळे, सागर वर्पे यांच्यासह 250 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मतदारसंघामध्येच रोजगार उपलब्ध झाल्याने मुंबई-पुण्याला जाणारे लोंढे थांबले ; दिलीप वळसे पाटील
नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा : झिरवळ
काल (दि.12) वळसे पाटलांसाठी मतदारसंघात महायुतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे नेते नरहरी झिरवळांनी मतदारांना नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा अशी साद घातली आहे. नरहरी झिरवळ म्हणाले की, विधानसभेत मी गेलो तेव्हा मी नवखा होतो. आपले कामं करुन घेण्यासाठी मागे बसणारे उमेदवार विधानसभेत पाठवायचे की पुढे बसणारे पाठवायचे आहेत, याचा विचार करावा लागेल. मी नवीन होतो तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे मागे बसायचो आता, नव्या माणसाचे प्रेशर किती पुन्हा एबीसीडी करायची की आता पीएचडी करायची. दिलीप वळसे पाटील पीएचडीच्याही पुढे गेलेले आहेत. त्यामुळे नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा, असे झिरवळ म्हणाले.