Download App

फडणवीस अन् अजितदादा हसले, शिंदेंचा चेहरा मात्र पडला.. महायुतीच्या बैठकीत CM ठरला?

मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde in Mahayuti Meeting : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार इतकं मात्र सध्या निश्चित दिसत आहे. मुख्यमंत्रि‍पदाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली याची तपशीलवार माहिती अजून समोर आलेली नाही. मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.

या बैठकीचे फोटो बाहेर आल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे आता स्पष्ट झाले आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव तरी हीच गोष्ट सांगत होते. याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहबोली सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. या फोटोत भाजप नेते देवेंद्र फडणवीस अमित शहा यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. शेजारीच एकनाथ शिंदे उभे आहेत. यावेळी फडणवीस आणि शहा दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे. शिंदे मात्र गंभीर मुद्रेत दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मलूल आणि उदास भाव स्पष्ट दिसत आहेत.

आणखी एका फोटोत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार पुष्पगुच्छ देऊन अमित शहा यांचा सत्कार करताना दिसत आहेत. या फोटोतही शिंदे, देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आहेत. सर्वच नेते हसताना आणि आनंदी भावात दिसत आहेत. मात्र या फोटोतही शिंदेंच्या चेहऱ्यावरील भाव गंभीर दिसत आहेत. याही फोटोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळावं अशी मागणी सातत्याने होत होती. परंतु, यावेळी तसं घडताना दिसत नाही. भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं  आहे.  या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत मी माझी भूमिका मांडली असे सांगितले. तसेच माझा चेहरे कधी उदास दिसत असला तरी आमच्यात सगळं काही व्यवस्थित आहे असेही सांगि्तले.

“मी काळजीवाहू मुख्यमंत्री, तुम्हाला माझा चेहरा..” दिल्लीतील बैठकीनंतर शिंदेंचं मोठं विधान

शिवसेनेला गृह अन् अर्थ खातं द्या : एकनाथ शिंदे

अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सरळ मुद्द्यांवरच चर्चा केल्याचे समजते. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर सध्या असलेल्या खात्यांपेक्षा पाच अधिक वजनदार खाती मिळावीत. उपमुख्यमंत्रिपद देणार असाल तर अर्थ किंवा गृह यांपैकी एक पद मिळावं अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

follow us