Download App

निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलणार, गणितं जुळवायला खूप वाव ; दिलीप वळसे पाटील

Dilip Valse Patil Exclusive Interview : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला.

ते म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासोबत माझा संपर्क 1990 सालापासून रामकृष्ण मोरे यांची पहिली विधानसभा निवडणूक होती, तेव्हापासून आलाय. सगळे डोंगर मी पायी फिरलेलो आहे. त्यानंतर सहा महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होती. त्यावेळी आदिवासी लोकांनी सांगितलं की, तुम्ही प्रचाराला येवू नका. आम्ही तुम्हाला चांगल्या मताधिक्याने निवडून देवू. त्यांनी ते करून दाखवलं. तेव्हापासून आदिवासी भागातील छोट्या-मोठ्या गोष्टींवर सतत लक्ष ठेवून आहे. आईच्या नावाची अनुसुया उन्नती केंद्र सुरू केलंय. यातून चार-महिला आदिवासी भागात जातात. त्यांच्या अडीअडचणी अर्जावर लिहून घेतात. त्यांना सरकारी योजनांविषयी सांगतात. यावर आम्ही मार्ग काढत पुढे जातो, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

मी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. तेव्हा कांतिलाल उमा हे माझे पर्सनल सेक्रेटरी होते. तेव्हा कांतिलाल उमा यांनी हट्ट धरला. इंजिनिअरींग कॉलेजविषयी मंत्रिमंडळात मग प्रस्ताव मांडला. विलासराव देशमुख यांच्यासमोर युक्तिवाद केला. प्रत्येकजण मंत्री झाल्यानंतर आपापल्या भागासाठी काहीतरी करतं, म्हणून हा प्रस्ताव आणला. यावर विलासराव देशमुख यांनी मंजूरी दिली आणि कॉलेज बनलं, असं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं. यावेळी निधी कसा खेचून आणला यावर बोलताना ते म्हणाले की, मूळ प्रस्ताव जिल्हास्तरापासून समोर येतो, मग तो राज्यस्तरावर जातो.

मोठी बातमी : काँग्रेसचा बंडखोरांना दणका! पाच नेते सहा वर्षांसाठी निलंबित

शिवारीराव आढळराव पाटील सोबत आल्यानंतर प्रचार करायची गरज वाटतेय का? यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, प्रचार करायची गरज नाही. पण शेवटी लोकशाहीमध्ये कोणालाही गृहीत धरून चालत नाही. लोकशाहीत आपलं काम आपल्याला करावंच लागतं. लोक मतं देतील असं गृहीत धरून चालत नाही. त्यामुळे जिथं जिथं जाणं आवश्यक आहे, तिथं जावंच लागतं. शिवाजीराव आढळराव पाटील सोबत आहेत. परंतु ते वेगळा प्रचार करतात, मी वेगळा प्रचार करतो, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. दोघं एकत्र फिरत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

‘पाणी पळवण्याचं षडयंत्र, म्हणून वेगळी भूमिका घ्यावी लागली’, दिलीप वळसे पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट

दिलीप वळसे पाटलांची ही आठवी टर्म आहे. त्यांच्या वडिलांच्या काळातील निवडणूक आणि आताची निवडणूक यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, त्यावेळची निवडणूक आणि लोक दोन्ही वेगळे होते. आजच्यासारखी निवडणूक त्या काळात होत नव्हती. उमेदवार म्हणून एखाद्या गावात जावून त्या गावातील प्रमुखाला भेटले, तरी संपूर्ण गावांचं मतदान व्हायचं. आता तसं नाही, त्यामुळे त्याकाळी जास्त संघर्ष करावा लागत नव्हता. वडिल 1967 साली निवडून आले होते. राजकारणात यायचं माझ्या डोक्यातच होतं. मुंबईत शिकायला गेल्यानंतर मी थोडाथोडा राजकारणात सहभाग घ्यायला लागलो. त्यानंतर 1985 साली तिकीट मागत होतो, परंतु तेव्हा मिळालं नाही. त्यानंतर पाच वर्षांनी मला तिकीट मिळालं आणि मी निवडून आलो, असं वळसे पाटील म्हणाले आहेत. पार्टीने सांगितलं की, महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्हीच लढायला पाहिजे, दुसरं कोणी लढलं नाही पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होईल, हे सांगणं अवघड आहे. प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतात, हे महत्वाचं आहे. निवडणुकीनंतर काही राजकीय समीकरणं सुद्धा बदलतील. सरकार आणण्यासाठी गणित जुळवावं लागेल, सहा पक्ष आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडूण येणार, यावर सरकार स्थापनेचं समीकरण ठरणार आहेत. त्यामुळे मॅथेमॅटिक्स जुळवायला खूप वाव आहे, असं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं आहे,

 

follow us