Download App

सिंचनात दीडपट वाढ होणार, 23 गावातील शेतकरी बांधवांना फायदा होणार ; आमदार राणाजगजितसिंह पाटील

Rana Jagjitsingh Patil from Tuljapur Assembly Constituency : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात (Tuljapur Assembly Constituency) राणा जगजितसिंह पाटील यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचार, दौरे करण्यास सुरूवात केलीय. यावेळी राणा जगजितसिंह यांनी (Rana Jagjitsingh Patil) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील केशेगाव, करजखेडा आणि पाटोदा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना संबोधित केले.

OnePlus 13 अखेर लाँच, पॉवरफुल प्रोसेसर अन् भन्नाट फीचर्स, किंमत आहे फक्त …

भविष्यात ज्या उपसा सिंचन योजना कार्यान्वित होणार आहेत. त्या सर्व बंद पाईपलाईनद्वारेच राबविण्याचा धोरणात्मक निर्णय महायुती सरकारने यापूर्वीच घेतलेला (Maharashtra Assembly Election 2024) आहे. त्यामुळे आता निम्न तेरणेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे थेट शेतकरी बांधवांच्या शिवारात दाखल होणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात टाळला जाणार असून सिंचनक्षेत्र 6,000 हेक्टरवरून 9,000 हेक्टर होणार आहे, असं राणा जगजितसिंह म्हणाले आहेत.

सिंचनात दीडपट वाढ होणार असल्याने २३ गावातील शेतकरी बांधवांना त्याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास आहे. तुळजापूर, धाराशिव आणि औसा या 3 तालुक्यातील 23 गावांतील शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनाच्या दुरुस्ती खर्चास आपल्या महायुती सरकारने 113 कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या महत्वपूर्ण योजनेच्या दुरूस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण स्वतः भेटून निधी उपलब्ध करून देण्यासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये विनंती केली होती.

स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी या तिन्ही विभागाकडून अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक त्रुटी होत्या, त्या दूर करून तिन्ही विभागाच्या समन्वयाने दुरूस्तीच्या कामास मंजुरी घेतली आहे. आता निम्न तेरणेतून 23 गावांतील शेतकरी बांधवांच्या थेट शिवारात बंद पाईपलाईनद्वारे पाणी येणार आहे.
तेरणा धरणातून तेर येथे याचप्रकारे बंद पाईपलाईनद्वारे योजना राबविण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यात बाधा निर्माण झाल्या. आता नवीन तंत्रज्ञानामुळे या तांत्रिक त्रुटी दूर झाल्या आहेत.

नायगावमध्ये शरद पवार गटाच्या नेत्याची बंडखोरी; काँग्रेसचं टेन्शन वाढण्याची शक्यता

राज्यातील अनेक ठिकाणी बंद पाईपलाईनचा वापर करून यशस्वीरित्या राबविल्या जात आहेत. तेर येथील तांत्रिक अडचण देखील आता या नव्या तंत्रज्ञानामुळे दूर होणार आहे. निम्न तेरणा योजनेसाठी डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे तेव्हाच 42 दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आले आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही आणि होणारही नाही. अशक्यप्राय वाटणारे अनेक प्रकल्प आणि योजना मागील अडीच वर्षांच्या काळात आपल्या सर्वांच्या सोबतीने यशस्वी करून दाखविल्या आहेत. भविष्यात यापेक्षाही अधिक ताकदीने आपल्याला पुढे जावयाचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण आहे, असं आवाहन त्यांनी केलंय.

 

follow us