Ravindra Chavan : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यावेळी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. यातच भाजप (BJP) नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी महायुती राज्यात 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा केला आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज कापसाळ येथील माटे सभागृहात दापोली, गुहागर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विजय होणार आहे. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. आज गुहागर, दापोली आणि रत्नागिरीमधील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत. तसेच महायुतीमध्ये दापोली मतदारसंघावरून कोणताही वाद नव्हता तो एक गैरसमज होता असं पत्रकारांशी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले.
पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, रत्नागिरीत बाळ माने यांनी भाजपा सोडून विचारांशी गद्दारी केली आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महायुतीमध्ये आता कोणतेही मतभेद राहिलेले नाही. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत आणि महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. असेही यावेळी ते म्हणाले.
… तर मशिदींवरून लाऊडस्पीकर उतरवणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा
तर बारसू येथील संपादित 5 हजार एकर जागेत रिफायनरी येण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला होता मात्र तेच रिफायनरी होऊ नये यासाठी विरोध करीत आहेत. असं पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले. तसेच राजापुरातील स्थानिक आमदार रिफायनरीला समर्थन देतात आणि ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत रिफायनरीला विरोध करतात असं देखील उदय सामंत म्हणाले.