Download App

मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं.., मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं नाही, या शब्दांत मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट सांगितलयं.

Manoj Jarange News : मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभा राहायचं नाही, या शब्दांत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी निवडणुक लढवणार का? या चर्चांना पूर्णविराम देऊन टाकलायं. राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असतानाच मनोज जरांगे यांनी 288 मतदारसंघात उमेदवार करणार असल्याची घोषणा केलीयं. या पार्श्वभूमीवर लेटस्अप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी मनोज जरांगे यांची लेटसअप चर्चा या विशेष कार्यक्रमात मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.

महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना…, ‘मोर्शी’ मध्ये मैत्रीपूर्ण लढत की अजितदादांची माघार?

मनोज जरांगेंनी घोषणा केल्यानंतर जरांगे यांना उमेदवारीसाठी राज्यातील अनेक राजकीय नेते भेटीसाठी अंतरवली सराटीला जात आहेत. अशातच मुलाखतीदरम्यान, मनोज जरांगे यांना तुम्ही निवडणूक लढवणार का? असा सवाल करण्यात आला. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभा नाही राहायचं. मी समाजाचं योगदान आणि कष्ट माझ्या स्वार्थासाठी नाही वापरणार. समाजाचे योगदान आणि कष्ट मी गरीब मराठा समाजासाठीच वापरणार असून राज्यातलं मराठा-मुस्लिम-दलित समीकरण जुळल्यास त्यांचेच लेकंर मोठे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस मोठी चूक करत असल्याचं मोठं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलंय. तसेच मराठा आरक्षण देवेंद्र फडवीसचाच विरोध असून त्याच्यासारखा खुनशी राजकारणात कोणीही नसला पाहिजे. आमची राज्यातील 288 मतदारसंघात निवडणूक लढायची तयारी आहे, अनेक मतदारसंघात आमचे उमेदवार लाखोंनी मते घेणारे आहेत. मराठा समाजाशिवाय एकही जागा निघू शकत नाही. मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधकांचीच मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

राज्याला लवकरच एक उमदा नेता मिळणार…राहुरीत तनपुरेंनी फोडला प्रचाराचा नारळ; भाच्यासाठी मामा मैदानात

देवेंद्र फडणवीस हा असा गैरसमज करुन घेत आहे. ही फडणवीस त्याच्या आयुष्यातील मोठी चूक करुन घेत असून हा गैरसमज पसरवायला त्याने सडक्या टोळ्या लावल्या आहेत. राज्यात मराठा-मुस्लिम-दलित एकत्र आहेत. त्यामुळे कोणाचीच जागा निवडून येऊ शकत नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय. निवडणुकीत याआधी काही लोकांनी प्रयोग केलेले आहेत, हे उमेदवार आणि काही अपक्ष उमेदवारांसोबत एखाद्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे मग त्यांचं मतदान आपोआप ते खातील असं त्यांच्या डोक्यात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आरक्षणावर मोदी-शाहांनी एकही शब्द तोंडातून काढला नाही
मराठा आरक्षणाबाबत मंत्री अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं, असं आमच्याकडून माध्यमांसमोर सांगण्यात येत होतं. भाजप आमचे वैरी नाहीत, आधी मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण दिलं होतं, त्यानंतर राज्यात भाजपचे 106 आमदार निवडून आले. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही लक्ष घाला, मोदी शाहांच्या शेकडो सभा झाल्या पण त्यांनी तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

follow us