उद्धव ठाकरे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील; आंबेडकरांची बोचरी टीका

नियम आहे, नियमात कोणाचीही बॅग तपासण्याचा अधिकार पोलिसांना आहे. स्वतःला कायद्याच्यावर कोणी समजू नये - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) प्रचाराचा धुरळा उडला असताना राज्यातील प्रमुख नेते विविध मतदारसंघांत हजेरी लावताहेत. यातच निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने निवडणूक अधिकाऱ्यांकडून (Election Officer) तपासणी केली जात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची मागील दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीह (Prakash Ambedkar) भाष्य केलं. उद्धव ठाकरे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील, असा टोला त्यांनी लगावला.

रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये तृप्तीच्या हॉट अदा, चाहते घायाळ 

प्रकाश आंबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीविषयी विचारले असता ते म्हणाले की,
सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात. माझीही बॅग तपासली जाते. नियम आहे, नियमात कोणाचीही बॅग तपासण्याचा अधिकार पोलिसांना आहे. स्वतःला कायद्याच्यावर कोणी समजू नये, सगळेच कायद्यापुढं समान आहेत.. बॅग तपासल्यामुळे उद्धव ठाकरे संताप व्यक्त करत असतील तर ते स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत, अशा शब्दात आंबेडकरांनी निशाणा साधला.

मु्स्मिम समाजाने सगळीकडे वोट जिहाद सुरू केलाय, आता आपल्यालाही मतांचे धर्मयुद्द करण्याची वेळ आली, या फडणवीसांच्या वक्तव्याविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले की, हे धर्मयुद्ध नाही तर हे पक्षयुध्द नाही. धर्मयुद्ध म्हणायला हे काही हिंदू-मुस्मिम, हिंदू-बौध्द, हिदू-जैन किंवा ख्रिश्चन-बौध्द यांच्यातील युद्ध नाही. हे धर्मयुद्ध आहे असं सांगून सत्ताधारी केवळ आपली पोळी भाजून घेत आहेत. अशी विधान करून ते स्वत:चा पाच वर्षांचा कालखंड लपविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका आंबेडकरांनी केली.

जिल्हा बँकेवर बोलण्याचा तनपुरेंना नैतिक अधिकार नाही; शिवाजीराव कर्डिलेंचा हल्लाबोल 

पुढं आंबेडकर म्हणाले की, सर्व मुस्लिम बांधवांना सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडीला मत द्या. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर विरुद्ध अपशब्द लिहिला, त्यावेळी आम्ही एक बील मांडलं. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की असा काही कायदा नाही. मुस्लिम बांधवांनी काँग्रेस व भाजपचे राज्य बघितले आहे, त्यांच्या काळात कायदा आलेला नाही. मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, आमची सत्ता आल्यास आम्ही महमंद पैगंबरांचे बील मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन आंबेडकारांनी दिलं.

दरम्यान, बॅग तपासल्यामुळे उद्धव ठाकरे संताप व्यक्त करत असतील तर ते स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत, या आंबेकरांच्या टीकेवर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Exit mobile version