Download App

EVM विरोधात काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीही मैदानात, उभारणार जनआंदोलन

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचीच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. काँग्रेस (Congress) , राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष (NCPSP) आणि शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena) पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील ईव्हीएम विरोधात पुरावे शोधण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

तर आता वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएम च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत.

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

भांडी घासा अन् बाथरूम स्वच्छ करा, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांना शिक्षा

वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

follow us